scorecardresearch

सातारा : सातारा लोणंद रस्त्यावर कांदा वाहतूक करणारा ट्रक पलटी

या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी कांदा व्यवसायिकाचे मोठे नुकसान झाले.

truck carrying onions overturned satara
सातारा लोणंद रस्त्यावर कांदा वाहतूक करणारा ट्रक पलटी (image – लोकसत्ता टीम)

वाई : सातारा लोणंद रस्त्यावर शिवथर गावच्या हद्दीत कांद्याने भरलेला ट्रक अवघड वळणावर रात्री पलटी झाला. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी कांदा व्यवसायिकाचे मोठे नुकसान झाले.

हेही वाचा – अजित पवारांवर तेलंगणच्या भाजपा आमदाराची खालच्या पातळीवर टीका; अमोल मिटकरी म्हणाले, “अशा प्रवृतीला भर चौकात…”

हेही वाचा – “झेपत नसेल तर..”, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना केले लक्ष्य

साताराकडून लोणंदकडे कांद्याने भरलेला ट्रक जात असताना अवघड वळणावर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने तो शिवथर गावच्या हद्दीत पलटी झाला. यामुळे या परिसरात रस्त्यावर सर्वत्र कांदा पसरला होता. ट्रक रस्त्यावर आडवा पडल्याने सातारा वाठार लोणंद फलटणकडे जाणारी येणारी वाहतूक प्रभावित झाली. सकाळपासून रस्त्यावर पसरलेला कांदा बाजूला घेण्याचे काम सुरू आहे. ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 12:51 IST