scorecardresearch

Premium

अकलूजजवळ रुग्णवाहिकेच्या अपघातात तरूण डॉक्टरचा मृत्यू

माळशिरस तालुक्यातील गारवाड पाटीजवळ रूग्णवाहिका आणि टोयोटा मोटारीची धडक बसून घडलेल्या अपघातात एका तरूण डॉक्टरचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.

A young doctor dies in an ambulance accident near Akluj
अकलूजजवळ रुग्णवाहिकेच्या अपघातात तरूण डॉक्टरचा मृत्यू

सोलापूर : माळशिरस तालुक्यातील गारवाड पाटीजवळ रूग्णवाहिका आणि टोयोटा मोटारीची धडक बसून घडलेल्या अपघातात एका तरूण डॉक्टरचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. वसंत भोसले (वय ३५, रा. अकलूज) असे मृत डॉक्टरचे नाव आहे. ते स्वतः टोयोटा मोटार चालवत होते. सोलापूर जिल्हा परिषदेच्या माळशिरस तालुक्यातील मांडकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ते कार्यरत होते.या घटनेची माहिती अशी की,रुग्णवाहीका (एमएच ११ सीएच ९३ २४) ही म्हसवड येथून एका रुग्ण बालकाला घेऊन अकलूजमध्ये रूग्णालयात दाखल करण्यासाठी सायरन वाजवत निघाली होती. तेव्हा गारवाड पाटी येथे मांडकीहून अकलूजकडे निघालेल्या टोयोटा मोटारीची (एमएच १० बीए ४३ ४५) रूग्णवाहिकेला पाठीमागून धडक बसली. यात मोटार चालक डॉ. वसंत भोसले हे गंभीर जखमी झाले.

त्यांना अकलूज येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात टोयाटा मोटारीचे मोठे नुकसान झाले आहे. माळशिरस पोलीस ठाण्यास या अपघाताची माहिती कळविण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. मृत डॉ वसंत भोसले यांच्या पश्चात वृध्द आई-वडील, पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे. ऐन तारुण्यात त्यांच्या अपघाती मृत्यु झाल्यामुळ वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

two dead after bike rams into divider on lalbaug flyover
मुंबईः लालबाग उड्डाणपुलावर अपघातात दोघांचा मृत्यू
Explosion ordnance factory Bhandara killed Jawahar Nagar marathi news
भंडारा : आयुध निर्माणी कंपनीत भीषण स्फोट; एका कर्मचाऱ्याचा मृत्यू
sexual abuse minor girl amravati district hospital multai village madhya pradesh marathi
अमरावती : मामाने केले १४ वर्षीय भाचीचे लैंगिक शोषण; वैद्यकीय तपासणीनंतर…
16 suspects detained in case of offensive message in Nandgaon taluka
नांदगाव तालुक्यात आक्षेपार्ह संदेशप्रकरणी १६ संशयित ताब्यात

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A young doctor dies in an ambulance accident near akluj amy

First published on: 30-11-2023 at 22:38 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×