मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज ( ७ फेब्रवारी ) वरळीत सभा घेणार आहेत. यावरून युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. कितीही नेते येऊदे वरळीतील गल्लीगल्लीत फिरायला लावणार, तरी विजय आपलाच होणार, असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला.

आदित्य ठाकरेंच्या संवाद यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. नाशिकच्या चांदोरी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. “पाठीवर वार करुन विरोधी पक्षात बसवण्यात आलं. वरळीतून लढणं जमत नव्हतं, तर मला फोन करुन सांगायचं, मी ठाण्यात येऊन लढलो असतो,” असा टोला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

हेही वाचा : सत्यजीत तांबे प्रकरणावर नाना पटोलेंचं मोठं विधान; म्हणाले, “चुका झाल्यात, पण…”

“मला मोठ्या सभा घ्यायच्या नाहीत, मला अशाच छोट्या सभा घ्यायच्या आहेत. मोठ्या सभा घेतल्या तर नागरिकांमध्ये जाता येत नाही. गद्दार आणि मुख्यमंत्री सभा घेतात, तेव्हा खोके वाटले जातात. पण, तरीही खुर्च्या रिकाम्या असतात,” असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

हेही वाचा : बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण ॲक्शन मोडमध्ये, मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार; म्हणाले, “थोरात पक्ष सोडून…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“दुःख याचं नाही की उद्योग बाहेर गेले; मात्र राजकीय अस्थिरत्यामुळे रोजगार येत नाहीत. कधीही एवढं घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात नव्हतं. माझ्याकडे देण्यासारखं काही नाही मी तुमच्याकडून घ्यायला आलेलो आहे. सध्या राज्यात गलिच्छ राजकारण सुरू आहे. हे राजकारण बदलायचं आहे. जेव्हा तुम्ही मला भेटता बोलता, तेव्हा वाटतं की महाराष्ट्राला सुवर्णकाळ येईल; पण महाराष्ट्राचा सुवर्णकाळ हरवला आहे,” असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.