सोलापुरात सोमवारी (२५ एप्रिल) दुपारी रस्त्यावर थांबलेल्या मालट्रकवर पाठीमागून इनोव्हा मोटार जोरात आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. मृत व जखमी कर्नाटकातील हुबळी-धारवाड आणि मिरज येथील राहणारे आहेत.

सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीजवळ दुपारी दोनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. इनोव्हा मोटार मिरज येथून सांगोलामार्गे सोलापूरहून पुढे कर्नाटकातील बीदरकडे निघाली होती. सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीजवळ वर्दळीच्या ठिकाणी एक मालमोटार दुपारच्या रणरणत्या उन्हात विश्रांतीसाठी थांबली होती. तेव्हा पाठीमागून आलेली इनोव्हा मोटार थांबलेल्या मालमोटारीवर जोरात आदळली.

Clashes Erupt, Between Groups, During Shri Ram Navami Procession, Nagpur Police Lathi Charge, Control Situation, ram navami nagpur clashes, nagpur ram navami, crime story nagpur, clashes ram navami, ram navami clashes,
नागपुरात आक्रित…रामनवमीच्या शोभायात्रेत पोलिसांवर दगडफेक! पोलिसांकडून लाठीचार्ज…
Pune, firing, Firing on youth,
पुणे : शहरात गोळीबारची तिसरी घटना, काडीपेटी न दिल्याने तरुणावर गोळीबार
dombivli ganesh nagar marathi news, dombivli concrete road broken marathi news
डोंबिवली: पंधरा दिवसांपूर्वी तयार केलेल्या गणेशनगर मधील काँक्रीट रस्त्याची तोडफोड, नागरिकांमध्ये तीव्र संताप
Mobile theft in Local train
प्रवाशाच्या व्हिडिओमुळं मुंबई ट्रेनमधील मोबाइल चोर पकडला आणि एका मृत्यूचंही गूढ उकललं

मृतांमध्ये दोन बालक व दोन महिलांचा समावेश

या भीषण अपघातात पाचजणांचा जागीच मृत्यू झाला. चौघा जखमींवर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये दोन बालक व दोन महिलांचा समावेश आहे. जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

हेही वाचा : बीड : अंबाजोगाईमध्ये भीषण अपघात, ट्रक आणि जीपच्या धडकेत सहा प्रवासी जागीच ठार!

सचिन आण्णासाहेब शितोळे (वय ३५), दिलीप जाधव (वय ३७), सोनाबाई जाधव (वय ५५), गौरी दिलीप जाधव ( वय ५) आणि लाडू दिलीप जाधव (वय ३) अशी मृतांची नावे आहेत. तर रेखा दिलीप जाधव, विनायक बसवराज देवकर (वय २७) आणि वर्षा सचिन शितोळे या जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.