मुंबई-गोवा महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास एसटी बस आणि मोटारसायकलची भीषण धडक झाली. यामध्ये एकजण जागीच ठार झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राथमिक माहितीनुसार, महाड तालुक्यातील नाते येथून वाकी गावाकडे चार तरुण एकाच मोटारसायकलवरून जात होते. महामार्गावरील चांभार खिंड गावच्या हद्दीमध्ये अचानक समोरुन आलेल्या एसटी बसची जोरदार धडक बसली आणि यामध्ये एकजण जागीच ठार झाला. दिलीप घोगरे (वय २०, राहणार वेल्हा पुणे) असे मयत तरुणाचे नाव आहे. तर अन्य तिघं गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी महाड येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident on mumbai goa highway one dead three injured
First published on: 21-01-2019 at 10:06 IST