अमरावती येथे नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अॅसिड हल्ला केल्याची घटना घडली. पीडित विद्यार्थिनी गंभीर जखमी असून तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवले असून एकाला चौकशीसाठी ताब्यातही घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाळा सुटल्यानंतर घरी जाताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी तिच्या अंगावर अॅसिड फेकले. यामध्ये ती विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. एकतर्फी प्रेमप्रकरणातून हा प्रकार झाल्याचा संशय पोलिसांना असल्याचे ‘एबीपी माझा’ने म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी पीडित मुलीचा एका मुलाबरोबर वाद झाला होता. हल्ला करणारा तोच मुलगा होता की कोणी दुसरा होता, याचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी एकाला ताब्यात घेतले असून अजून विस्तृत माहिती समजू शकलेली नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Acid attack on school girl in amravati
First published on: 05-12-2017 at 20:05 IST