लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : एका गंभीर गुन्ह्याच्या तपासात कच्चे दुवे सोडण्यासाठी आणि अटकेतील आरोपीला लवकरात लवकर जामीन होण्याच्या अनुषंगाने अनुकूल मदत करण्यासाठी संबंधित आरोपीच्या वडिलांकडे पाच लाखांची लाच मागितली आणि तडजोडीत दोन लाखांची लाच स्वीकारण्यास संमती दिल्याप्रकरणी एका पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

मोहोळ तालुक्यातील कामती पोलीस ठाण्यातील हे प्रकरण आहे. सचिन जाधवर असे हवालदाराचे नाव आहे. या लाचलुचपतीच्या तक्रारीची पडताळणी एक वर्षापूर्वी झाली होती. तपासाअंती हवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-सोलापुरात आठ जागांसाठी २८ उमेदवारी अर्ज दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यातील तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध कामती पोलीस ठाण्यात मागील वर्षी गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यास अटक झाली होती. इतर आरोपींनाही अटक करावयाची होती. परंतु या गुन्ह्याचा तपासात आरोपींच्या बाजूने कच्चे दुवे सोडण्यासाठी, इतर आरोपींना अटक न करण्यासाठी, तसेच अटकेतील आरोपीला लवकर जामीन मंजूर होण्याच्या दृष्टीने मदत करण्यासाठी हवालदार जाधवर याने आरोपीच्या वडिलांना पाच लाखांची लाच मागितली. तडजोडीत लाख रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, तक्रारदाराने याबाबत सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार व पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या पथकाने तपास करून कारवाई केली.