मुख्यमंत्री आपला असला पाहिजे यासाठी निवडणूक महत्त्वाची आहे हे लक्षात घ्या असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. २०२२ मध्ये आपला पक्ष फोडला गेला. त्यावेळी मला उद्धव ठाकरेंनी सांगितलं किती मावळे आहेत बघ, त्यानंतर मी आज जिथे बोलतोय याच हॉलमध्ये बैठक घेतली. त्यावेळी बाहेर पाऊस पडत होता. मात्र या हॉलमध्ये जी बैठक झाली त्यानंतर गद्दार मुंबईत यायला घाबरत होते. पोलिसांच्या सुरक्षेत ते मुंबईत आले. त्यामुळे या हॉलची आठवण खास आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसंच ३०३ वरुन ते २४० वर गेले हा आपल्या देशाचा विजय आहे असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.

कीर्तिकर यांचीही जागा आपण जिंकणार

मुंबईत नगरसेवक, गद्दार आमदार, खासदार पळून गेले आणि आपली यंत्रणा खेचून आपण नऊ जागा जिंकलो. निगेटिव्हमधून सुरु करत आपण नऊ जागा जिंकलो. जो पक्ष सत्तेत आहे त्यांना दुसऱ्यांकडून नेते घ्यावे लागले. जो पक्ष देशात मोठा होता त्यांनी धाडी वगैरे टाकल्या आणि तेवढं सगळं करुनही नऊच जागा इथे जिंकल्या. कीर्तिकर यांचीही जागा आपण जिंकणार आहोत. अनिल परब यांनी शब्द दिला आहे असंही आदित्य ठाकरे मुंबईतल्या मेळाव्यात म्हणाले.

Jitendra Awhad, Eknath shinde, Jitendra Awhad give statement about Eknath shinde, funds distributio, Jitendra Awhad criticise ajit pawar, thane news, latest news,
तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेगळे होते, अजितदादांनी मला हरविण्याचा प्रयत्न चालवला; जितेंद्र आव्हाड यांची टोलेबाजी
arvind kejriwal health
“केजरीवाल कोमात जाऊ शकतात”; आप खासदाराचा दावा, आप आणि तिहार तुरुंग अधीक्षकांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबाबत मतभेद का आहेत?
ganesh naik waiting for about two and a half hours to meet minister uday samant
गणेश नाईक अडीच तास ताटकळत; मुख्यमंत्र्यांच्या खात्यावर गंभीर आरोपांनंतर सामंतांशी चर्चेसाठी प्रतीक्षा
Nobody will be spared in run and hit case says Chief Minister Eknath Shinde
“रन अँड हिट प्रकरणात कोणालाही पाठीशी घेतली जाणार नाही…” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
nashik bjp ladki bahin yojana
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांची मतपेरणी, नाशकात स्वतंत्र कक्ष
pankaja munde reacts on Who is face of post of Chief Minister
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? विचारताच पंकजा मुंडे म्हणाल्या…
cm eknath shinde announcement
राज्य सरकारनं केली ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’ची घोषणा; कोणत्या धर्मीयांना मिळणार लाभ? एकनाथ शिंदे म्हणाले…
chief minister eknath shinde chandrababu naidu avoided to allocate cabinet portfolio to their sons
दोन मुख्यमंत्र्यांची अशीही ‘घराणेशाही’ !

आणखी काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आपल्या भाषणात आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री असेल यासाठी निवडणूक महत्त्वाची आहे. उद्या ही हेडलाईन. पुन्हा नोंदणी करण्याची पाळी येऊ देऊ नका. अर्धी निवडणूक आपल्या हाती आली आहे. निवडणुकीत सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. जी आपले लोक आहेत ती आपली जबाबदारी आहे.” असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

हे पण वाचा- “ज्यांनी दिली साथ, त्यांचा करतो आम्ही घात हे भाजपाचं ब्रीदवाक्य”, आदित्य ठाकरेंचा टोला

सिनेटमध्ये सुद्धा आपण १० पैकी १० जिंकलो यामधून आपली नोंदणी जास्त असल्यामुळे विजय आपला होतो. अनिल परब यांच्या समोरच्या बॉक्समध्ये फक्त १ नंबर काढायचा आहे. उद्धवजी सांगतील जास्त मतदान पाहिजे, अनिल परब सांगतील जास्त मताधिक्य आहे. जेव्हा निवडणुकीत आपला उमेदवार ठरवायचे होते, तेव्हा सगळ्यांचे काम आणि टर्म पहिले आहेत. पोतनीस यांची टर्म संपत आहे, पण अनिल परब यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी अनेकांनी मागणी केल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.

उद्धव ठाकरेंशिवाय पर्याय नाही

लोकांना कळलंय, उद्धव ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही, अनिल परब यांच्यावर अनेक केसेस आहेत, ती सुद्धा केस स्टडी ठरू शकते. माझ्यावर एक केस आहे, दिलाईड रोडवर आम्ही गाडी चालवली. रोड सुरु केला त्याबद्दल केस घेतली आहे. आपल्या हक्कासाठी परब यांनी केस घेतल्या आहेत. भाजपकडे ही केस आहेत, पण त्यांच्याकडे रेवण्णा आहे. त्याच्यासाठी मोदींनी जाऊन प्रचार केला आहे. ही आपली विधानसभेसाठी तयारी आणि सराव आहे. काही ठिकाणी मतदान विभागले आहे, पण ही निवडणूक पक्की आहे. आता लोकांना कळलं आहे, उद्धव ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.