कर्जत : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी त्यांची आई सुनंदा पवार या आता मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. कर्जत शहरांमध्ये त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांना मुलगा रोहित पवार याला विजयी करण्यासाठी आवाहन केले आहे. या गाव भेटीला नागरिकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे पहावयास मिळते.

रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर महाराष्ट्रामध्ये स्टार प्रचारक म्हणून सभा घेत आहे. कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये देखील त्यांना महायुतीकडून आमदार राम शिंदे यांनी मोठे आव्हान दिले आहे. असे असताना देखील रोहित पवार हे राज्यामध्ये प्रचार सभा घेत आहेत. तर आपल्या मुलाच्या प्रचारासाठी आईने मैदानामध्ये उडी घेतली आहे. त्यांनी मतदारसंघातील वाडी वस्तीवर जाऊन मतदारांच्या गाठीभेटी बैठका घेत प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतली आहे.

हेही वाचा – Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची खोचक शब्दांत टीका, “महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत, कारण..”

गेल्या पाच वर्ष निवडून आल्यापासून आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुंनदाताई पवार या कर्जत जामखेड मतदारसंघात काम करत आहेत. मतदारसंघात महिला बचत गटाचे मोठे जाळे विणले आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचं काम त्यांच्याकडून केले जात आहे. मग ते भिमथडी यात्रेत महिलांना स्टॉल उपलब्ध करून देण्यापासून तर त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणे असो. आत्तापर्यंत कर्जत जामखेड मतदारसंघातील महिला बचत गटांना ३४ कोटी रुपये कर्ज मिळालं, त्यात सुनंदाताई पवार यांचा मोठा वाटा आहे.

आजवर बँका या महिला बचत गटांना बिलकूल सहकार्य करत नव्हत्या. आमदार रोहित पवार आणि त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यातून योग्य मार्ग काढल्यानंतर बँका बचत गटांना कर्ज देऊ लागल्या आणि आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच ३४ कोटी रुपये कर्ज मिळणे ही साधी गोष्ट नाही आणि विशेष म्हणजे या कर्जाची परतफेड करण्याचं प्रमाणही जवळपास ९९ टक्के आहे.

हेही वाचा – Eknath Shinde : महायुतीत बिनसलं? शिंदे, पवारांचा रवी राणांवर संताप; मुख्यमंत्री म्हणाले, “युतीत मिठाचा खडा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असल्याने सर्वच पक्षाच्या प्रचाराने जोर पकडलाय. आमदार रोहित पवार यांचे जसे सर्व क्षेत्रात काम आहे तसंच सुनंदाताई पवार याही महिला बचत गट, जलसंधारण, वृक्षारोपण, स्वच्छता, महिलांचं आरोग्य अशा विविध क्षेत्रात काम करत आहेत. सुनंदाताई पवार यांनी आता प्रचाराची धुराही खांद्यावर घेतली आहे आणि त्याही गावोगावी जाऊन नागरिकांच्या भेटी घेऊन आमदार रोहित पवार यांना निवडून देण्याचं आवाहन करत आहेत.