राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर २८ ते ३१ जुलै दरम्यान विदर्भ व मराठवाड्याचा दौरा केला. यानंतर त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला या दौऱ्यातील निरिक्षणं सांगत एकूण २१ मागण्या केल्या आहेत. तसेच यावर त्वरीत कार्यवाही करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली. त्यांच्या या मागण्यांमध्ये वाहून गेलेल्या शेतीपासून अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या पिकांबाबत विशेष बाब म्हणून मागण्या केल्या आहेत.

अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र लिहिलं आहे. तसेच विविध मागण्या करत सरकारने या विषयांवर गांभीर्याने व साकल्याने विचार करावा व अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी, अशी विनंती केली.

अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लिहिलेले पत्र पान क्र. १

अजित पवारांनी नेमक्या काय मागण्या केल्या.

अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लिहिलेले पत्र पान क्र. २

अजित पवार यांनी या पत्रात म्हटलं, “पुरात वाहून गेलेली जमीन पुर्ववत करण्यासाठी आर्थिक मदत द्यावी, राज्यातील बऱ्याच भागात दुबार पेरणीचे संकट असल्याने तूर, हरभरे बियाणे उपलब्ध करून द्यावे, अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या व वाहून गेलेल्या विहिरींची मनरेगातून दुरुस्ती करण्यास विशेष बाब म्हणून परवानगी द्यावी आणि ठिबक सिंचन व तुषार सिंचन संच वाहून गेल्याने विशेष बाब म्हणून ७ वर्षांच्या आतील संचाला देखील पुन्हा अनुदान द्यावे.”

अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लिहिलेले पत्र पान क्र. ३

अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लिहिलेले पत्र पान क्र. ४

अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लिहिलेले पत्र पान क्र. ४

अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लिहिलेले पत्र पान क्र. ५

अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लिहिलेले पत्र पान क्र. ५

हेही वाचा : “राज्याचे प्रमुखच नियम तोडतात, मग तिथले पोलीस आयुक्त…”, हसत हसत अजित पवारांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडे जमीन धारण क्षमता अधिक असल्याने नुकसान भरपाईची दोन हेक्टरची मर्यादा शिथिल करावी, अतिवृष्टीत वाहून गेलेल्या जनावरांच्या पोस्ट मार्टमची अट शिथिल करून पोलीस पाटील, सरपंच, पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांचा दाखला ग्राह्य धरावा, अतिवृष्टीमुळे खराब झालेले मुख्य रस्ते व पाणंद रस्ते तातडीने दुरुस्त करावेत. त्यासाठी नव्याने निधी द्यावा,” अशीही मागणी अजित पवार यांनी केली.