Ajit Pawar : माळेगाव सहकारी साखर कारखाना आणि इतर साखर कारखान्यांच्या निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार यांची माळेगाव मध्ये सभा झाली. त्यावेळी अजित पवार यांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा उल्लेख करत एक विधान केलं ज्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला. तसंच साखर कारखान्यावर कर्ज नाही विरोधक फेक नरेटिव्ह पसरवत आहेत असंही अजित पवार म्हणाले.

काय म्हणाले अजित पवार?

समोर उमेदवार उभा आहे, तुम्हाला जर शंका आली की आपल्या गुणवाडीला प्रतिनिधीत्व नाही, पण कुणीही घाबरण्याचं कारण नाही. मीच तुमचा प्रतिनिधी आहे असं अजित पवार म्हणाले. तसंच विविध निवेदनं वाचून दाखवली. मी आता उमेदवार आहे पण आचारसंहितेचा भंग न करता हे सांगतो की काम होणार, काम दर्जेदार झालं पाहिजे. २४ जून होऊ द्या मी कुठेही पळून चाललो नाही असंही अजित पवार म्हणाले.

मीच चेअरमन होणार आहे त्यामुळे सगळं नियमाने करणार-अजित पवार

मी निवडणुकीपुरतं सांगत नाही पण आम्ही एफआरपीपेक्षाव जास्त दर दिला. विरोधक सांगतात की साखर कारखान्यावर कर्ज आहे. पण तशी स्थिती नाही. साखरेचा २३९ कोटींचा साठा आहे. वसंतराव शुगर इन्स्टिट्युटने आपल्याला पुरस्कार दिला आहे. विरोधक सांगतात साखर भिजली वगैरे तसं काहीही घडलेलं नाही. आता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. मीच चेअरमन असल्याने सगळं काही नियमानं करणार आहे असंही अजित पवार म्हणाले.

माझी बायको म्हणते…

“अर्ध पुतळ्याला हार घालण्यासाठी गेलो. माझं इतकं बारीक लक्ष होतं की तिथे जी दोन वठलेली झाडं होती ती पाहिल्यावर लगेच सांगितलं की वठलेली झाडं ठेवायची नाहीत. माझी नजर एवढी बारीक आहे की माझी बायको म्हणते कुठून याची नजर इतकी बारीक आहे. मला आवड आहे नीट लक्ष ठेवण्याची, ते माझं पॅशन आहे.” असं अजित पवार म्हणाले. ज्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“काही जण सांगतील माझी शेवटची निवडणूक आहे. अरे, किती निवडणूक ऐकतो आहे शेवटची निवडणूक… वय झालं की विस्मरण होत. माझं वय झालं की उद्या माझंही होईल. ते म्हणतात अजित पवार सहकार मोडायला चालले आहेत. माझ्या काळातील प्लनिंग बघा, इमारती बघा. तुम्हाला जरी संधी मिळाली नाही तरी तुम्हाला आगामी काळात कामगार भरतीत संधी दिली जाईल. आपण ऑल इन वन आहोत,” असं अजित पवार म्हणाले.