बारामती लोकसभा मतदारसंघातील पवार विरुद्ध पवार लढत रंगतदार होणार हे चित्र स्पष्ट झाल्यानंतर सुप्रिया सुळे आणि अजित पवार या बहिण – भावातील संघर्ष दिवसेंदिवस समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवर अप्रत्यक्ष भाष्य करताना म्हटले होते की, मी संसदेत गेल्यानंतर माझा नवरा माझी पर्स सांभाळण्यासाठी कँटिनमध्ये येत नाही. मी मेरिटवर संसदेत गेली आहे. सुप्रिया सुळेंचा टीकेचा रोख हा सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्याकडे होता. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी आता अजित पवार यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांचा बारामती मतदारसंघात झंझावाती दौरा सुरू आहे. बारामती येथे एका सभेत बोलत असताना अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंची नक्कल केली. “१५ वर्षांत कधी फोन नाही केला किंवा नीट बोलले नाहीत आणि आता कार्यकर्त्यांची विचारपूस केली जात आहे. अनेकांना फोन केले जात आहेत.”, असे सांगून अजित पवार यांनी नक्कल करून दाखविली. मी कुणालाही फोन करत नाही. मी सकाळपासून लोकांच्या कामाला लागतो. मला लोकांची सेवा करण्याची आवड आहे, असेही अजित पवार म्हणाले.

Rohit Pawar
“पाणी वाटपासाठी महिलांना पैसे दिले” म्हणणाऱ्या रवी राणांना रोहित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “एवढा खर्च केला असेल, तर…”
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
eknath shinde
मित्रपक्षांकडून युती धर्माचे पालन नाही; शिंदे गटाच्या आमदारांकडून नाराजी; ठाणे, पालघर पक्षाकडेच ठेवण्यासाठी आग्रह
CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”

“मतं मागायला मी सदानंद सुळेंना फिरवत नाही, स्वतःच्या मेरिटवर…”, सुप्रिया सुळेंची टीका; रोख कोणावर?

मी पर्स सांभाळायला कँटिनमध्ये जाणार नाही

“काम करायचं असेल तर जो नगराध्यक्ष असेल त्याच्याशी नगरसेवकाला गोडच बोलावं लागतं. तरंच निधी मिळतो. मुख्यमंत्र्यांकडून कामं करून घ्यायची असेल तर आमदाराने त्यांना सन्मान द्यावा लागतो. वाचाळवीर होऊन राजकारणात काम होत नाही. टीका-टिप्पणी करून चालत नाही आणि कुणी कुणाची पर्स सांभाळायला संसदेत जाणार नाही”, असे उत्तर अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंच्या कँटिनबाबतच्या विधानावर दिले.

संसदेत जाऊन सारखं मोदी-शाह यांच्यावर टीका केल्यामुळं तुम्हाला कोण सांभाळून घेणार. संसदेत नुसती भाषणं करून चालत नाही, लोकांची कामही झालं पाहीजे. भाषण तर कोणताही पट्टीचा वक्ता करू शकतो. पण भाषणाबरोबर कामही झालं पाहीजे, अशीही टीका अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली. यावर प्रत्युत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझा कार्यअहवाल तपासल्यावर लक्षात येईल की, केंद्रातील प्रत्येक मंत्र्याकडून मी कामं करून घेतली आहेत. सर्व मंत्र्यांशी माझे चांगले संबंध आहेत. जेव्हा जेव्हा माझ्या लोकसभा मतदारसंघातील कामासाठी मदत मागितली तेव्हा ती मिळाली आहे.