गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सलग सातव्यांदा भाजपा गुजरातमध्ये निवडून आला आहे. गुजरातमध्ये भाजपाने सर्वाधिक १५६ जागा मिळवत दमदार कामगिरी केली आहे. तर, काँग्रेसला केवळ १७ जागांवर समाधान मानावे लागलं आहे. दुसरीकडे हिमाचल प्रदेश भाजपाच्या हातून निसटलं आहे. तिथे काँग्रेसला बहुमत मिळालं आहे. काँग्रेसला ४० जागा मिळाल्या आहेत. भाजपाला २५ जागांवर समाधान मानावं लागलं आहे.

यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड्डा ( जे पी नड्डा ) यांना खोचक टोला लगावला आहे. अजित पवार म्हणाले, “जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाच्या अध्यक्षांना आपलं राज्य टिकवता आलं नाही. हिमाचल प्रदेश हे नड्डा यांचे राज्य असून, ते तेथून भाजपाचे अध्यक्षपद भूषवतात. ही त्यांची नामुष्की आणि कमीपणा नाही का?. मात्र, भाजपाने गुजरातमध्ये जोर लावला होता. सर्वात जास्त बहुमत भाजपाला यंदा मिळालं,” असेही अजित पवार यांनी सांगितलं.

हेही वाचा : “उद्धव ठाकरेंकडे ब्रह्मास्त्रापेक्षा जास्त प्रभावी अस्त्र आहे, ते म्हणजे…”, निकालानंतर फडणवीसांचं प्रत्युत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर बोलताना अजित पवारांनी मुख्यमंत्री बोम्मई यांच्यावर टीका केली आहे. “महाविकास आघाडीच्या खासदारांनी सीमावादावरून गृहमंत्री अमित शाहांना पत्र दिला आहे. पण, एकीकडे बोम्मई हे शांततेच आवाहन करून परत भडकवण्याचे काम करतात. आज देखील कर्नाटकातील मराठी भाषिकांवर अन्याय करण्यात येत आहे. ‘कन्नड रक्षण वेदिका’ संघटनेकडून कर्नाटकात ‘हम करेसो कायदा’ असे वागले जाते,” असा आरोप अजित पवारांनी केला आहे.