जळगावातील पाचोऱ्यात आज उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच जळगावमधील राजकीय वातारवरण चांगलच तापलं आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट, दोघांकडूनही एकमेकांना आव्हानं-प्रतिआव्हानं दिली जात आहेत. अशातच आता ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यांनी शिंदे गटाला इशारा दिला आहे. जर उद्धव ठाकरे यांच्या सभेत कुणी आडवं गेलं, तर आम्ही सुद्धा त्याला जशास तसं उत्तर देऊ, असे ते म्हणाले. जळगावात माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “फडणवीस घोटाळेबाजांची टोळी चालवतात का?”, मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून संजय राऊतांचं टीकास्र; म्हणाले, “मी मुंबईला गेल्यावर…”

काय म्हणाले अंबादास दानवे?

“पाचोऱ्यात विराट सभा होणार आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. शिंदे गटाच्या नेत्यांनी दिलेल्या आव्हानांचा कोणताही परिणाम आजच्या सभेवर होणार नाही. याउलट अशी आव्हानं दिली तर शिवसैनिका त्वेषाने या सभेला येतील, यांची आव्हानं परतून लावणं ही आमच्यासाठी मोठी गोष्ट नाही”, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली.

हेही वाचा – खारघरमधील ‘त्या’ १४ जणांचा मृत्यू कशामुळे? शवविच्छेदन अहवाल आला समोर; वाचा नक्की काय म्हटलं

“आज राज्यात निवडणुका नाहीत, केवळ विचार व्यक्त करण्यासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेनेने आतापर्यंत कोणाच्याही सभेला अडवलेलं नाही. पण आता उद्धव ठाकरे यांच्या सभेत कुणी आडवं आलं, तर आम्हीही शांत बसणार नाही. या पुढे भविष्य त्यांच्याही सभा होणार आहे, तेव्हा शिवसैनिक काय करतील, याचा विचार त्यांनी करावा”, असा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा – “पिकनिकमुळे अनेकवेळा आले आणि…”, राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावर विनायक राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “दखल घ्यावी असं…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेवर दगडफेक करू अशा आशायाचं एक विधान केलं होते. त्यावरही अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. “गुलाबराव पाटलांचे हात आता दगड मारणारे नाही, तर खोके देणाऱ्या गद्दाराचे हात झाले आहेत. ज्याचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत, त्यांनी आता दगड मारण्याची भाषा करू नये”, असे ते म्हणाले.