शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून राज्याच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. वैचारिक विरोधक असलेले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सध्या महाविकास आघाडीच्या रुपात एकत्र आले आहेत. तर शिंदे गट आणि भाजपा यांनी युती करत राज्यात सरकार स्थापन केले आहे. दुसरीकडे मागील काही दिवसांपासून सर्वपक्षीय नेते वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत आहेत. अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार देवेंद्र भुयार यांचीही त्यांनी केलेल्या विधानामुळे चर्चा होत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना काही झालं तर तलवारीने हात छाटल्याशिवाय राहणार नाही, असे विधान भुयार यांनी केले आहे. ते अमरावतीत एका सभेला संबोधित करत होते.

हेही वाचा >> न्यायालयाच्या निर्णयानंतर सुनिल राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले, “संजय राऊतांनी ठरवलंय की…”

मुंबईच्या ठाकरे यांची दहशत कालही होती आणि आजही आहे. आमच्या नादाला लागायचे नाही. हर्षवर्धन दादांच्या नादाला तर बिलकूल लागू नका. शिवाजी संस्थेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही जाणीवपूर्वक धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही कार्यकर्त्याला धक्का लावण्याचे काम केले, तर तलवारीने हात छाटल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा, असे विधान देवेंद्र भुयार यांनी केले आहे. जुना देवेंद्र भुयार अंगात आणला तर तुमची पाटीलकी काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही भुयार यांनी दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा >> जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढणार? अनंत करमुसे मारहाण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात याचिका

दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात अमरावती जिल्ह्यातील शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीदरम्यान दोन गटांत वाद झाला होता. यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांना धक्काबुक्की झाली होती. या वादामुळे मतदान प्रक्रिया काही काळासाठी थांबवण्यात आली होती. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला होता.