scorecardresearch

आवडते नेते कोण? विचारताच अमृता फडणवीस म्हणाल्या, “घर की मुर्गी, दाल बराबर, माझे आवडते नेते…!”

अमृता फडणवीसांचे आवडते नेते देवेंद्र फडणवीस नसून…

amruta fadnavis on devendra fadnavis
अमृता फडणवीसांचे आवडते नेते देवेंद्र फडणवीस नसून…

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या त्यांच्या विधानांमुळे किंवा राज्य सरकारवर केलेल्या टीकेमुळे चर्चेत असतात. देवेंद्र फडणवीसांप्रमाणेच अमृता फडणवीस देखील राज्य सरकारवर आक्रमकपणे टीका करतात. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्यातील भाजपा रणनीती आखत असली, फडणवीस राज्यातल्या भाजपासाठी महत्त्वाचे नेते असले, तरी अमृता फडणवीस यांच्यासाठी मात्र देवेंद्र फडणवीस हे आवडते नेते नाहीत! अमृता फडणवीसांसाठी तेच आवडते नेते असतील, असा अपेक्षित समज असताना, त्याला फाटा देत अमृता फडणवीसांनी विदर्भातल्या दुसऱ्याच नेत्याचं नाव घेतलं! यावेळी मिश्किल टिप्पणी करताना “घर की मुर्गी दाल बराबर”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

नागपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना अमृता फडणवीस यांना त्यांच्या आवडत्या नेत्याविषयी विचारणा करण्यात आली. “तुमचे आवडते नेते कोण?” असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर उपस्थितांना अपेक्षित उत्तर होतं “अर्थात देवेंद्र फडणवीस!” पण झालं भलतंच. उलट अमृता फडणवीसांना घर की मुर्गी दाल बराबर वाटतेय!

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

आवडत्या नेत्याबद्दल विचारणा करताच अमृता फडणवीस मिश्किलपणे म्हणाल्या, “माझं या प्रश्नावर उत्तर फार सोपं आहे. याचं उत्तर देणं माझ्यासाठी फार काही कठीण नाही. हे पाहा, सगळ्यांसाठीच घर की मुर्गी दाल बराबर असते. त्यामुळे माझे आवडते नेते नितीन गडकरी आहेत”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या या उत्तराची राजकीय वर्तुळात देखील चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

अमृता फडणवीस यांचा उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाल्या, “आमची फक्त एकच अपेक्षा आहे, ती म्हणजे…”!

उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा!

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर देखील टीका केली आहे. “महाराष्ट्रात सध्या मै खाउंगा भी, खिलाऊंगा भी और खानेवालोंकी रक्षा भी करूंगा अशी परिस्थिती सुरू आहे. महाराष्ट्रात आमची एकच अपेक्षा आहे की प्रगतीचं राजकारण व्हायला हवं. भ्रष्टाचार बंद व्हायला हवा”, असं त्या म्हणाल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amruta fadnavis funny comment on devendra fadnavis in nagpur pmw