“पत्नीचा पगार माझ्यापेक्षा जास्त”; फडणवीसांच्या वक्तव्यावर अमृता म्हणतात…

अमृता फडणवीस एका खासगी बँकेमध्ये बड्या पदावर कार्यरत आहेत

देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस

‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ पुस्तकाच्या प्रकाशनावेळी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, “माझ्यापेक्षा माझ्या पत्नीला जास्त पगार आहे” असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावर आता देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले होते फडणवीस?

पुस्तक प्रकाशनाच्या वेळी फडणवीस आपल्या भाषणामध्ये कमाई आणि खर्चासंदर्भात बोलत होते. “आपल्याला मिळणारा पगार, पत्नीला मिळणारा पगार ही आपली आवक आहे. तर घरचा खर्च जावक आहे. त्याच्याकरिता जे काही वित्तीय व्यवस्थापन आपण करतो आणि तसंच राज्याचं वित्तीय व्यवस्थापन असतं. यामध्ये जास्त फरक नाही. फक्त राज्यात अधिक व्यापकता असते. राज्याला जास्त मोठं काम करावं लागतं. आपण बजेट नीट समजून घेतलं तर भीती निघून जाईल,” असं फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी “माझ्यापेक्षा माझ्या पत्नीला जास्त पगार आहे म्हणून मला तो लक्षात राहतो,” असं मिश्किल वक्तव्य केलं.

या वक्तव्यावर अमृता काय म्हणाल्या?

फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात अमृता यांच्याकडे विचारणा करण्यात आली. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमृता यांनी देवेंद्र फडणवीस खरं बोलल्याचे सांगितलं. “देवेंद्रजींनी जे वक्तव्य केलं आहे ते खरं आहे. देवेंद्रजी नेहमी खरं बोलतात. हो माझी आता तरी त्यांच्यापेक्षा टेकहोम सॅलरी जास्त आहे. माझा पगार जास्त असल्याचा त्यांना अभिमान वाटतो याचा मला गर्व आहे. पत्नीचा पगार आपल्यापेक्षा जास्त असल्याचं त्यांना वाईट वाटतं नाही. पुरुषांमध्ये जो इगो असतो तो देवेंद्रजींमध्ये नाहीय याचा मला आनंद आहे,” असं अमृता यांनी सांगितलं. अमृता सध्या एका खासगी बँकेमध्ये व्हाइस प्रेसिडंट म्हणून कार्यरत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Amruta fadnavis react on devendra fadnavis comment saying my wife salary is more than me scsg

ताज्या बातम्या