Parambir Singh Challenge to Anil Deshmukh: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांना खुलं आव्हान दिलं आहे. हे आव्हान आहे नार्को चाचणीचं. रोज उठून देवेंद्र फडणवीसांवर आरोप करणारे अनिल देशमुख हे आव्हान स्वीकारतील का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आज अनिल देशमुख यांनी त्यांना अडकवण्यामागे देवेंद्र फडणवीस आणि परमबीर सिंह ( Parambir Singh ) यांच्यात डील झालं असा आरोप केला होता. या आरोपांना परमबीर सिंह यांनी उत्तर दिलं. तसंच एक खुलं आव्हानही अनिल देशमुख यांना दिलं. अनिल देशमुख यांनी काय आरोप केला? "मी गृहमंत्री असताना मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ गाडीत बॉम्ब ठेवण्यात आला होता. त्यानंतर गाडी मालक मनसुख हिरेनची हत्या झाली. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये परमबीर सिंह जे तेव्हाचे मुंबई पोलिसांचे आयुक्त होते, तेच या प्रकरणाचे मास्टरमाईंड होते. त्यांना NIA मार्फत अटक होणार होती. त्यावेळेस फडणवीस आणि परमबीर सिंह यांच्यात बोलणं झालं आणि तेव्हा परमबीर सिंह फडणवीस यांना शरण गेले. तेव्हा फडणवीसांनी परमबीर सिंह यांना मदत करण्याचं आश्वासन दिले आणि त्यांना माझ्यावर आरोप करायला लावले. परिणामी, फडणवीस आणि परमबीर सिंह यांच्यात डील झाली होती आणि त्यानुसारच परमबीर सिंह ( Parambir Singh ) यांनी माझ्यावर आरोप लावले." असा गंभीर आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला आहे. मात्र या आरोपांना आता परमबीर सिंह ( Parambir Singh ) यांनी उत्तर दिलं आहे. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांना थेट आव्हान दिलं आहे. हे आव्हान आता अनिल देशमुख स्वीकारणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. काय म्हणाले परमबीर सिंह? “या प्रकरणावर मी आजपर्यंत कधीही सार्वजनिकरित्या बोललो नाही. मला जे सांगायचं होतं ते मी न्यायालयात सांगितलं. मात्र, अनिल देशमुख यांनी माझ्यावर जे गंभीर आरोप केले आहेत. माझ्यात आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात डील झाल्याचं ते म्हणत आहेत, त्यामुळे मला बोलणं भाग आहे. मुळात अनिल देशमुख ज्याप्रकारे बोलत आहेत, त्यावरून असं लक्षात येते की त्यांचे मानसिक संतुलन बिघडलं आहे” असं परमबीर सिंह ( Parambir Singh ) म्हणाले. हे पण वाचा- Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं गाण्याच्या एका ओळीत अनिल देशमुखांच्या आरोपांवर उत्तर, म्हणाले… परमबीर सिंह यांचं अनिल देशमुख यांना खुलं आव्हान मनसुख हिरेन हत्या प्रकरण असो की अंबानी यांच्या अँटलिया निवासस्थानाबाहेर बॉम्ब ठेवल्याचे प्रकरण असो, त्यातील सत्य तुम्ही लपवून ठेवलं. तुम्हाला बोलवल्यानंतर माहिती दिली नाही, असा आरोप अनिल देशमुख करत आहेत. असं विचारलं असता परमबीर सिंह ( Parambir Singh ) म्हणाले हरकत नाही माझी आणि अनिल देशमुख यांची नार्को चाचणी करता सगळं सत्य समोर येईल. अनिल देशमुख नार्को चाचणीसाठी तयार असतील तर माझीही तयारी आहे. त्यातून सगळंच सत्य समोर येईल. अनिल देशमुख आता म्हणतात मी माहिती दिली नाही. मग माझ्यावर कारवाई का केली नाही? अनिल देशमुख यांनी जे आरोप केले आहेत, त्यासंदर्भात त्यांनी त्यावेळी माझी चौकशी का केली नाही? माझ्यावर कारवाई का केली नाही? माझी तीन वेळा एनआयएकडे चौकशी झाली. त्या चौकशीत काहीच आढळले नाही. त्यामुळे आता आपण दोघं नार्को टेस्ट करुया, सत्य समोर येईल असं आव्हान परमबीर सिंह ( Parambir Singh ) यांनी दिलंय. तसंच अनिल देशमुखांच्या आदेशानंतरच सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेण्यात आलं असंही परमबीर सिंह यांनी टीव्ही ९ मराठीला सांगितलं.