करोना काळात मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपाने नेते किरीट सोमय्या यांनी केली होता. तसेच त्यांनी याबाबत तक्रारदेखील दाखल केली होती. याप्रकरणी आज सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांची चौकशी करण्यात आली. दरम्यान, यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी शिंदे सरकारवर अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा – ईडीने चार तास चौकशी केल्यानंतर महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

NCP politician Chhagan Bhujbal pulled out of Nashik LS race
भुजबळ यांच्या माघारीमुळे समता परिषदेचे राज्य नेतृत्वावर प्रश्नचिन्ह -बैठकीत उमेदवारी करण्याचा आग्रह
byju raveendran raised debt to pay march salaries of employees
बैजूजकडून कर्मचाऱ्यांच्या मार्चच्या वेतनाची कर्ज काढून पूर्तता
aam aadmi party AAP
आपचे खासदार संजय सिंह यांना मिळालेल्या जामिनाचे कारण काय? त्यांच्या वकिलांकडून नेमका काय युक्तिवाद करण्यात आला?
Damania plea
दोषमुक्तीविरोधात दमानिया यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल, भुजबळ कुटुंबीयांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

काय म्हणाले अनिल परब?

मुंबई महापालिकेच्या प्रभाग परिसीमन प्रकरणी दाखल याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मुंबई महापालिकेतील कथित भ्रष्टाचार प्रकरणी महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या चौकशीबाबत विचारण्यात आले असता, “इकबालसिंह चहल यांची चौकशी होते आहे, याचा अर्थ महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत”, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी शिंदे सरकारला लगावला.

दरम्यान, प्रभाग परिसीमन प्रकरणी दाखल याचिकेवरील सुनावणीबाबत बोलताना, “महाविकास आघाडी सरकार असताना मुंबई महापालिकेच्या २२७ वॉर्डाचे २३६ वॉर्ड करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयानेही या निर्णयाला मंजूरी देत त्वरीत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, करोना, पाऊस आणि ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. मात्र, नवीन सरकारने कायदा बदलून पुन्हा २३६ चे २२७ वॉर्ड केले. त्याला पुन्हा आमच्यावतीने आव्हान देण्यात आले होते आणि न्यायालयाने याला स्थगिती दिली. याबाबत आज सुनावणी झाली. यावेळी योग्य कारण न देता कायदा बदलता येत नाही, अशी बाजू आमच्या वकीलांकडून मांडण्यात आली. याबाबत दोन दिवसांत अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे”, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

हेही वाचा – “अजित पवारांची ‘ती’ इच्छा लवकरच पूर्ण होईल”, शिंदे गटाचे नेते दीपक केसरकरांचं विधान

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाच्या मुदतीबाबतही प्रतिक्रिया दिली. याबाबत आम्ही उद्या निवडणूक आयोगाकडे बाजू मांडणार असल्याचं, ते म्हणाले. तसेच चिन्ह आणि नावाबाबात बोलताना, याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे आवश्यक ती कागतपत्रे सादर केली असून याबाबतही लवकर निर्णय येईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.