राज्य सरकारच्या सुपरमार्केटमध्ये वाइन विक्रीच्या निर्णयाविरोधात अण्णा हजारेंनी प्राणांतिक उपोषण करणार होते. सोमवार १४ फेब्रुवारीपासून उपोषण करणार असल्याचं त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून कळवलं होतं. दरम्यान, आज राळेगण सिद्धीत माध्यमांशी बोलताना अण्णा हजारेंनी ग्रामसभेशी चर्चा करून नंतर उपोषणाबाबत निर्णय घेणार असं, सांगितलं होतं. या चर्चेनंतर त्यांनी उपोषण न करण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“सरकारला निरोप पोहोचवा, तुमच्या राज्यात मला जगायची इच्छा नाही”; वाइन निर्णयावरून अण्णा हजारे भावूक

अण्णा हजारेंच्या आंदोलनासंदर्भात राळेगण सिद्धीत आज ग्रामसभा झाली. यावेळी अण्णांनी उपोषण करू नये असा ग्रामसभेत ठराव करण्यात आला. अण्णांच्या वयाचा विचार करून उपोषणाचा निर्णय मागे घेण्याची विनंती यावेळी करण्यात आली. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, ग्रामसभेत अण्णा हजारेंनी त्यांच्या वयाचा विचार करत प्राणांतिक उपोषण करू नये, अशी विनंती ग्रामस्थांनी केली. त्यामुळे अण्णांनी उपोषणाचा निर्णय मागे घेतला आहे.

वाइन ही महाराष्ट्राची संस्कृती नाही –

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात वाइन आमची संस्कृती नाही. तुम्ही त्याची खुल्याने विक्री करताय, ते पाहून मला या सरकारच्या राज्यात जगायची इच्छाच उरलेली नाही,” असं अण्णा म्हणाले. “महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी किर्तनकार किर्तन करतात. पण सरकार किराणा दुकानात वाइन ठेवून ते क्षणात धुळीस मिळवत आहात. हे सर्व बघून आता जगण्याची इच्छा होत नाही. आयुष्याची ८४ वर्ष झालीत, तेवढी पुरेशी आहेत,” असं म्हणताना अण्णा हजारे यावेळी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anna hazare will not do hunger strike on vine selling decision hrc
First published on: 13-02-2022 at 16:18 IST