महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे. मध्यमवर्गाने पुन्हा राजकारण आणि चळवळीत यायल पाहिजे. या गोष्टी हातात घेतल्या पाहिजे. अन्यथा महाराष्ट्राची अवस्था उत्तरप्रदेश आणि बिहार सारखी होणार, अशी चिंता राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
लोकमान्य सेवा संघ पार्ले याच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. राज ठाकरे म्हणाले, “१९९१ नंतर बाजार खुला झाला तेव्हा भारतात चॅनेल्स, इंटरनेट आणि सर्वच गोष्टी येत गेल्या. यामुळे राजकारण, चळवळी आणि अन्य संस्थांमधून सुक्षिशित मध्यमवर्ग बाहेर पडला. माझी मुलं परदेशात जातील, काहीतरी बघतील, पण राजकारण आणि चळवळ या गोष्टी नको. त्याने श्रीमंत आणि गरिबांमधला दुवा हरवला गेला.”
“१९९५ पूर्वीचा काळ पाहा सर्व चळवळी सांभाळणारे आणि चालवणारे, मग कोणत्याही पक्षाचे असो मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गातील होते. श्रीमंत आणि गरिबातील तो दुवा होता. तो दुवा गेला. तो दुवा गेल्यावर कोण कोणाला सांभाळणार हा प्रश्नच पडला. १९९५ पूर्वी मध्यवर्गासाठी चित्रपट सुद्धा येत होते. ते सुद्धा बंद झाले,” असं राज ठाकरेंनी सांगितलं.
“आपल्याकडे असलेला सुक्षिशित आणि सुज्ञ मध्यमवर्ग होता. त्याच्यानंतर खालून एक फळी आली. पण, त्यात न शिकलेले लोक होते. त्यामुळे मोठी फूट पडली. १९९१ नंतर मार्केट खुलं झालं आणि मध्यमवर्गाला जग दिसायला लागलं. तो राजकारण आणि चळवळीतून बाहेर पडला. बाहेर पडत असताना त्याने मुलं आणि कुटुंबाचा विचार केला. राजकारण आणि चळवळीचा ऱ्हास सर्व मध्यमवर्ग बाहेर गेल्यामुळे झाला,” असं राज ठाकरेंनी म्हटलं.
हेही वाचा : “…असं वक्तव्य एखादी ‘सटवी’च करू शकेल”, चित्रा वाघ संतापल्या; नेमकं काय आहे प्रकरण?
“हा मोठा वर्ग पुन्हा राजकारणात यायला पाहिजे. या गोष्टी हातात घेतल्या पाहिजेत, सांभाळल्या पाहिजेत. नाहीतर हे प्रकरण हाताबाहेर जाणार आणि महाराष्ट्राची अवस्था उत्तर प्रदेश-बिहार सारखी होईल. मला त्याची सर्वात जास्त भिती वाटत आहे,” असंही राज ठाकरे