दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईतल्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सर्व प्रमुख नेत्यांमध्ये भाजपाविरोधातल्या विरोधी पक्षांच्या आघाडीवर सविस्तर चर्चा झाली. अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत.

अरविंद केजरीवाल म्हणाले, दिल्लीत आमचं सरकार आलं आणि काहीच दिवसांत केंद्र सरकारने आमच्या शक्ती हिरावल्या. आमच्या अधिकारांवर घाला घालणारा वटहुकूम काढला. परंतु आठ वर्ष आम्ही सर्वोच्च न्यायालयात लढाई लढलो आणि आठ वर्षांनी सर्वोच्च न्यायालयाने आमच्या बाजूने निर्णय दिला. परंतु या निर्णयानंतर अवघ्या आठच दिवसात केंद्र सरकारने नवा अध्यादेश काढून आमची शक्ती हिरावली. हे लोक सुप्रीम कोर्टाला मानत नाहीत.

dekhi cabinet minister raajkumar anand
‘आप’ला धक्का! ईडीच्या छाप्यानंतर केजरीवाल सरकारमधील दलित मंत्र्याचा राजीनामा, कोण आहेत राज कुमार आनंद?
Arvind Kejriwal aap Rajkumar Anand resigns
अरविंद केजरीवालांना मोठा धक्का, दिल्लीतल्या मंत्र्याचा राजीनामा, आम आदमी पार्टीवर गंभीर आरोप करत म्हणाले…
Arvind Kejriwal
अरविंद केजरीवाल तुरुंगात असूनही मुख्यमंत्रीपदी कायम राहू शकतात? उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
Shashi Tharoor talk on PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय कोण? काँग्रेस नेते शशी थरूर म्हणतात…

अरविंद केजरीवाल म्हणाले, दिल्लीतल्या जनतेच्या सरकारविरोधात वटहुकूम काढून भाजपाने हुकूमशाही सुरू केली आहे. राज्यसभेत या अध्यादेशासंदर्भातलं विधेयक मांडलं जाणार, तेव्हा शिवसेना (ठाकरे गट) याचा विरोध करेल. उद्धव ठाकरे यासाठी आमच्या बाजूने आहे. ते आमचं समर्थन करतील असं वचन उद्धव ठाकरे यांनी आम्हाला दिलं आहे. जर हे विधेयक राज्यसभेत मंजूर झालं नाही, तर २०२४ मध्ये देशात मोदींच सरकार येणार नाही.

दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले, सर्वोच्च न्यायालायाने निवडून आलेल्या दिल्लीतल्या आप सरकारला सर्व अधिकार दिले होते. परंतु, केंद्र सरकारने नवीन अध्यादेश काढून दिल्ली सरकारचे सर्व अधिकार राज्यपालांना दिले आहेत. हे लोक सुप्रीम कोर्टाचे आदेश मानत नाहीत. मोदी सरकारमधील मंत्र्यांनी, नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना घाणेरड्या शिव्या दिल्या. हे लोक न्यायाधीश आणि न्यायव्यवस्थेविरोधात सोशल मीडियावर मोहीम राबवतात. यांचे लोक निवृत्त न्यायाधीशांना देशद्रोही म्हणतात. त्यांचा न्यायव्यवस्थेवरच विश्वास नाही.

हे ही वाचा >> “…मग निवडणुका घेताच कशाला?” उद्धव ठाकरेंना भेटल्यानंतर अरविंद केजरीवालांचा मोदी सरकारला संतप्त सवाल

केजरीवाल म्हणाले, मोदी सरकारमधले लोक आता म्हणतायत की, सर्वोच्च न्यायालयाने काहीही निर्णय दिला तरी आम्ही ऐकणार नाही. आम्ही अध्यादेश आणून सर्वोच्च न्यायालयाचे निकाल उलथवून टाकू, अशी त्यांची भूमिका आहे. हे लोक जनतेने निवडून दिलेलं सरकार पाडतात, आमदार खरेदी करतात, त्यांच्या मागे ईडी-सीबीआयचा ससेमिरा लावतात. जर यांना इतकाच अहंकार असेल तर मग हे लोक निवडणुका घेतातच कशाला.