ठाकरे गटातील नेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. डाव्होस दौऱ्यात तब्बल ३५ ते ४० कोटींचा खर्च करण्यात आला, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. त्यांच्या याच आरोपाला ठाकरे गटातील नेते तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आदित्य ठाकरेंचे आरोप हास्यास्पद आहेत. आदित्य ठाकरे यांना वयामुळे अनुभव नाही, अशी खोचक टीका केसरकर यांनी केली आहे. केसरकरांच्या याच विधानारवर आता ठाकरे गटातील नेते अरविंद सावंत यांनी आक्रमक पवित्रा धारण करत चोख शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. केसरकरांनी स्वत:च्या दिव्याखाली अंधार आहे, तो बघायला हवा, अशी खोचक टीका केली आहे. ते आज मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
हेही वाचा >>> धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांचा नवा दावा; म्हणाले, “माईंड रीडर सुहानी शाह यांच्यापेक्षा मी करतो ते वेगळं आहे, कारण…”!
आदित्य ठाकरे यांनी युवा चळवळीत काम केलेले आहे
“दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे यांच्याकडे असलेली प्रगल्भता ज्येष्ठ नेत्यांकडेही नाही
“आदित्य ठाकरे यांनी राज्य प्लास्टिककमुक्त करण्यासाठी आपल्या सरकारला प्लास्टिक मुक्ताची कायदा आणायला लावला होता, हे विसरून चालणार नाही. आदित्य ठाकरे यांच्याकडे असलेली प्रगल्भता ज्येष्ठ नेत्यांकडेही नाही. त्यामुळे प्रगल्भता असलेली मुलं जेव्हा पुढे येतात तेव्हा त्यांच्या पाठीशी ज्येष्ठांनी उभे राहायला हवे,” असेही सावंत म्हणाले.
याचाच अर्थात आदित्य ठाकरे यांचे नेतृत्त्व समर्थ
“आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तर ते देत नाहीयेत. याचाच अर्थात आदित्य ठाकरे यांचे नेतृत्त्व समर्थ आहे. त्यांचा अभ्यास जबरदस्त आहे. त्यांनी राज्याला एक दिशा दाखवलेली आहे. आज मुंबईचे सुशोभिकरण केले जात आहे, त्याचा पाया आदित्य ठाकरे यांनीच रचलेला आहे. कसे चांगले काम करावे, हे आदित्य ठाकरे यांनी दाखवून दिले आहे,” असेही अरविंद सावंत म्हणाले.
हेही वाचा>>> ‘ठाकरे गट MIM शी युती करू शकतो’ म्हणणाऱ्या बावनकुळेंवर अंबादास दानवेंचे टीकास्र; म्हणाले, “तुम्ही आमच्या…”
दीपक केसरकर काय म्हणाले?
“आदित्य ठाकरेंना वयामुळे अनुभव नाही, हे आम्ही समजू शकतो. म्हणून रोज काही तरी बोलायचं आणि स्वत:चं हसं करून घ्यायचं, हे योग्य नाही. आदित्य ठाकरेंनी उद्धव ठाकरेंशी बोलावं, खात्री करून घ्यावी. जगभरातील लोक डाव्होसमध्ये चार्टर्ड विमानानेच येतात. चार्टर्ड विमानाने प्रवास केला म्हणजे फार मोठा गुन्हा केला, असं होत नाही. यापूर्वी अनेक मुख्यमंत्र्यांनी चार्टर्ड विमानाने प्रवास केला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंचे आरोप हास्यास्पद आहेत, असं प्रत्युत्तर दीपक केसरकर यांनी दिलं. डाव्होस दौऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांचं कमर्शियल विमानाचं तिकीट बूक करण्यात आलं होतं. मात्र, लवकर पोहोचावं यासाठी ते चार्टर्ड विमानाने गेले. अशातच तांत्रिक कारणांमुळे त्यांना डाव्होस पोहोचण्यात उशीर झाला. डाव्हासमध्ये ३७ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प महाराष्ट्रात येणार होते. अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी अनुपस्थित राहणं, हे योग्य नव्हतं. हा पंतप्रधानांचा अपमान ठरला असता,” असे दीपक केसरकर म्हणाले.
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind sawant criticizes deepak kesarkar for remark on aditya thackeray leadership prd