सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी झाल्याच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात गावभेटीवर असताना त्यांच्या मोटारीवर हल्ला झाला. पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तरूणांच्या जमावाने केलेला हल्ला प्रत्यक्षात मराठा आरक्षण आंदोलनाच्या आडून भाजपनेच केल्याचा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. आपल्यावर थेट हल्ल्याचा प्रयत्न झाला. परंतु बचावले. यात मोटारीचे नुकसान झाले. महिला आमदारावर हल्ला करणे निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

उमेदवारी जाहीर होण्याअगोदरपासून आमदार प्रणिती शिंदे संपूर्ण  मतदारसंघात गावभेटींच्या माध्यमातून सक्रिय झाल्या आहेत. यापूर्वी मंगळवेढा तालुक्यात पाटखळ त्यांना मराठा आरक्षण आंदोलकांनी रोखण्याचा प्रयत्न केला होता. मोहोळ भागातही असे प्रसंग घडले. पंढरपूर तालुक्यात काही गावांना त्यांनी भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. याच तालुक्यात सरकोली येथे रात्री त्या आल्या असता तरूणांच्या जमावाने ‘एक मराठा-लाख मराठा’अशा घोषणा देत आपल्या मोटारीवर हल्ला केला. हा हल्ला आपल्यावरच होता. परंतु यात आपण बचावल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले. मात्र हा हल्ला मराठा आरक्षणाच्या आडून भाजपच्या समर्थकांनी केला, असा आरोप त्यांनी केला.

Santosh Parab attack case,
संतोष परब हल्ला प्रकरण : नितेश राणे यांना मंजूर जामीन रद्द करा, राज्य सरकारच्या याचिकेवर उच्च न्यायालयाची राणे यांना नोटीस
nan patole
विशाल पाटलांवरील कारवाईस टाळाटाळ; सांगलीत काँग्रेस मेळाव्यात आघाडीचे काम करण्याचे आवाहन
hemant patil
भाजपहट्टापुढे शिंदेसेना हतबल; हिंगोली, यवतमाळचे उमेदवार बदलण्याची नामुष्की
Shahu Maharaj
शाहू महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह संदेश; सतेज पाटील यांची पोलिसांकडे तक्रार