औरंगाबादमध्ये २० मे २०१८ च्या मध्यरात्री झालेल्या जातीय दंगली प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडवण्यासाठी जैस्वाल यांनी क्रांतीचौक पोलीस ठाण्यातील खुर्चा, काचांची मोडतोड करून पोलिसांना शिवीगाळ केली होती.  या प्रकरणी आता शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विविध गुन्ह्यात प्रत्येकी सहा महिन्याची शिक्षा असली तरी ती एकत्रच भोगावयाची आहे. अतिरिक्त व जिल्हा सत्र न्या. एस. एम. भोसले यांनी शिक्षेचा निर्णय सुनावला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार चंद्रकांत निवृत्ती पोटे यांनी फिर्याद दिली होती.

पोलीस ठाण्यात गोंधळ; शिवसेना महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांना अटक

सरकारी कामाता अडथळा निर्माण केल्याप्रकरणी औरंगाबादमधील मध्य विधानसभा मतदार संघाचे शिवससेना आमदार प्रदीप जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा व ५ हजार रुपये दंड ठोठवला गेला आहे. कलम ३५३ नुसार सहा महिने कारावास आणि २५०० रुपये दंड, किंवा दंड न भरल्यास एक महिना शिक्षा ठोठवली गेली आहे. तसेच, कलम ५०६ नुसार सहा महिने कारावास व अडीच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना शिक्षा सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी सरकारी अभियोक्ता म्हणून ए.एस.देशपांडे यांनी कामकाज पाहिले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aurangabad shiv sena mla pradip jaiswal sentenced to six months msr
First published on: 31-05-2021 at 16:30 IST