लोकसभा निवडणुकीत आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढतो आहे. सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की ज्या राणाने अपमानित केलं त्यांचा प्रचार आम्ही करणार नाही. कार्यकर्त्यांची मानसिकताच नाही. राजकारणात झीरो झालो तरीही चालेल पण इतकी शरणागती पत्करणार नाही. काहीही झालं तरीही राणांचा प्रचार करायचा नाही ही कार्यकर्त्यांची मानसिकता आहे असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

भाजपाचाच चांगला उमेदवार आम्हाला मिळाला आहे. उमेदवाराचं नाव जाहीर होईल तेव्हा बऱ्यापैकी काम झालेलं असेल. काही दलित बांधवांच्या संघटना, मुस्लिम बांधवांच्या संघटना यांना भेटलो. भाजपातले काही कार्यकर्ते असेही आहेत ज्यांना मोदी हवे आहेत पण खासदार म्हणून राणा नको आहेत. त्यांचीही आम्हाला पाठिंबा द्यायची तयारी आहे. शिवसेनेतलेही काही जण तयार आहे. त्यामुळे सर्वपक्षीय उमेदवार असू शकतो. असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

Shahu Maharaj, Sanjay Mandalik,
वारसा नको तर विकासावर बोलूया; संजय मंडलिक यांचे शाहू महाराजांना थेट खुल्या चर्चेचे निमंत्रण
vishal patil sangli marathi news, sangli lok sabha marathi news
सांगलीत विशाल पाटीलांमुळे ठाकरे गटाची कोंडी
reaction of krupal tumane, MP, eknath shinde, ramtek lok sabha constituency, lok sabha election 2024
उमेदवारी नाकारल्यानंतर शिंदे गटाच्या खासदाराची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले “हो मी दुःखी, पण….”
What Ramdas Athwale Said?
रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट, “देवेंद्र फडणवीस मला शिर्डीतून उमेदवारी देणार होते, पण एकनाथ शिंदे..”

हे पण वाचा- “…त्या गोष्टीचा बदला घेतला पाहिजे, त्यांना दणका देणार”, बच्चू कडूंचा महायुतीविरोधात शड्डू? लोकसभेला उमेदवार उभे करणार?

वर्ध्यातले दोन मतदारसंघ अमरावतीत येतात, वर्ध्यात तुम्ही उभे राहा असं सांगितलं आहे. अमरावतीचा निर्णय आम्ही घेतला आहे. वर्ध्याचा निर्णयही आम्ही घेऊ. आम्ही असा निर्णय घेण्याचं कारण रवी राणाच आहे. तसंच भाजपाला रवी राणाबाबत अतिप्रेम आहे. भाजपाकडून आम्हाला विचारणा झाली नाही. आम्हाला भाजपाने विश्वासात घेतलं नाही. असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. राणाची दादागिरी जर असेल तर आम्ही त्यांचा पराभव करु असंही बच्चू कडूंनी म्हटलं आहे. आम्हाला मिळालेला उमेदवार चांगला आहे. भाजपातला माणूस आमच्या साथीला आहे. माझी आणि त्यांची दोन वेळा भेट झाली. आम्ही त्या उमेदवारासह समोर येऊ. महायुतीतून बाहेर पडण्यापेक्षा आम्ही मित्रत्वाच्या नात्याने लढू असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

बच्चू कडूंनी भाजपाविरोधात आपली नाराजी व्यक्त केली आहे. जागावाटप करताना कार्यकर्त्यांचाही विचार करावा लागतो. आमचा तर पक्ष आहे, तरीही भाजपाने आमचा विचार केला नाही. ही गोष्ट काही आम्हाला चांगली वाटली नाही असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.