महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर सनसनाटी आरोप करत खळबळ माजवून दिली आहे. निलेश राणे यांनी आनंद दिघे यांच्या मृत्यूसाठी बाळासाहेबांना जबाबदार ठरवलं आहे. तर दुसरीकडे बाळासाहेबांनी गायक सोनू निगमच्या हत्येचा कट रचला होता असा आरोप निलेश राणे यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सोनू निगमलाही बाळासाहेबांना ठार मारायचं होतं. तसे अनेकदा प्रयत्नही झाले, हवं तर तुम्ही याबाबत त्यांनाच विचारा आज बाळासाहेब नाहीत तर ते खरं सांगतीलही. सोनू निगम आणि ठाकरे घराण्याचं नात काय? हे मला सांगायला लावू नका, अन्यथा हे सर्व मी जाहीर सभेत सांगेन’, अशी धमकीच निलेश राणे यांनी दिली आहे.

बाळासाहेबांच्या कर्जतच्या फार्महाऊसवर कोणा कोणाचे मृत्यू झाले हे सर्व सांगेन. आमच्या नादी लागायचं नाही, आम्हाला राणे म्हणतात, अशा शब्दांत निलेश राणे यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे. एका मुलाखतीत त्यांनी हे आरोप केले आहेत.

आनंद दिघेंच्या हत्येचा कट रचला होता; निलेश राणेंचे बाळासाहेब ठाकरेंवर गंभीर आरोप

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. मात्र, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यावरुन त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे भासवण्यात आले, असा गंभीर आरोप निलेश राणे यांनी केला आहे. तसेच हा प्रकार दोन शिवसैनिकांना सहन न झाल्याने त्यांना संपवण्याचे आदेशही बाळासाहेबांनी दिल्याचा आरोपही निलेश राणे यांनी केला आहे.

आनंद दिघेंच्या हत्येचा कट रचल्याचे आणि त्यांचा मृत्यू रुग्णालयात झाल्याचं भासवण्यात आलं. हे दोन शिवसैनिकांना सहन झालं नाही, त्यामुळे त्यांचा आवाज दाबण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी कोणाला आदेश दिले. ही केस कशी दाबली गेली? असे सवाल करीत निलेश राणे यांनी गंभीर आरोप केले आहेत.

निलेश राणे यांनी सांगितलं आहे की, नारायण राणे आणि आम्ही आजपर्यंत शिवसेनेविरोधात बोलताना एक मर्यादा पाळली. बाळासाहेब ठाकरेंवर आम्ही कधीही आरोप केले नाहीत. आमच्या राणेसाहेबांचं आजही बाळासाहेबांवर प्रेम होतं मात्र ते व्यक्त करु शकले नाहीत. मी राणे साहेब म्हणत असलो तरी ते आधी माझे वडिल आहेत. त्यांचा जर जाहीर कार्यक्रमात कोणी अपमान करीत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. बाळासाहेबांची खरी परिस्थिती मला सांगावीच लागेल. माझ्यासाठी राणेसाहेब महत्वाचे बाळासाहेब नव्हे. आम्ही आजवर मर्यादा पाळली मात्र विनायक राऊतांनी व्यासपीठावर ती पाळली नाही.

काय म्हणाले होते विनायक राऊत –
नारायण राणेंच्या दहा वर्षातील राजकारणात त्या नऊ जणांचे बळी नेमके कोणी घेतले. हिंमत असेल तर नारायण राणेंनी उत्तर द्या असं आव्हान खासदार विनायक राऊत यांनी केलं होतं. रत्नागिरीतील वाटत जिल्हा परिषद गटाच्या शिवसेना मेळाव्यात बोलताना त्यांनी हे आव्हान दिलं. आमची निष्ठा पैशांवर नाही, आमची निष्ठा स्वार्थावर नाही. आम्हाला काही दिलं नाही तरी आमचं भगव्यावर असलेलं इमान, बाळासाहेबांवर असलेलं इमान कुठेही विकायला लावलेलं नाही. ते मनात जपून ठेवलेलं आहे असं विनायक राऊत यांनी म्हटलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thackeray planned to kill sonu nigam alleges nilesh rane
First published on: 15-01-2019 at 08:03 IST