राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. याचे दूरगामी परिणाम राज्याच्या राजकारणावर दिसतील. तसेच अजित पवारांच्या या बंडामुळे महाविकास आघाडीवर काही परिणाम होईल का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण गेल्या वर्षभरात महाविकास आघाडीला पडलेलं हे दुसरं खिंडार आहे. गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करत भाजपाशी हातमिळवणी केली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. महाविकास आघाडी विरोधी पक्ष म्हणून आक्रमक होत असतानाच आता राष्ट्रवादीत बंडखोरी झाली आहे. यामुळे महाविकास आघाडीत सध्या काय हालचाली सुरू आहेत याबद्दल लोकांमध्ये कुतूहल आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या कमी झाल्याने आता विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे येऊ शकतं. त्यामुळे काँग्रेस यावर दावा करणार का असा प्रश्नही उपस्थित होत आहे. या सगळ्या प्रश्नांना काही वेळापूर्वी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी उत्तरं दिली. काँग्रेसने विधान भवनात त्यांच्या नेत्यांची आणि आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते पदावर दावा केला जाऊ शकतो असं म्हटलं जात आहे. दरम्यान, या बैठकीपूर्वी बाळासाहेब थोरात यांनी टीव्ही ९ मराठीशी बातचित केली. यावेळी थोरात यांनी सांगितलं की, या बैठकीत आम्ही केवळ आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत.

दरम्यान, अजित पवार यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीवर परिणाम होतील, असं तुम्हाला वाटतंय का? असा प्रश्न बाळासाहेब थोरात यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, “कोणताही परिणाम होणार नाही. उलट महाविकास आघाडी अधिक भक्कम होईल.” काँग्रेसची पुढची दिशा काय असेल याबद्दल सांगताना थोरात म्हणाले, आम्ही सर्वजण महाविकास आघाडी म्हणून एकत्र रहणार. आम्ही मित्रपक्ष एकत्र चांगल्या पद्धतीने काम करणार.

हे ही वाचा >> “मी काय चुकीचं बोललो?”, देवेंद्र फडणवीसांनी ‘औरंग्याच्या अवलादी’ वक्तव्यावर दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अजित पवार यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीवर परिणाम होतील का? असा प्रश्न बाळासाहेब थोरात यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, काहिही परिणाम होणार नाही. उलट महाविकास आघाडी अधिक भक्कम होईल. काँग्रेसची पुढची दिशा काय असेल याबद्दल सांगताना थोरात म्हणाले, आम्ही सर्वजण महाविकास आघाडी म्हणून एकत्र रहणार. आम्ही मित्रपक्ष एकत्र चांगल्या पद्धतीने काम करणार.