Banjara society Sunil Maharaj Sanjay Rathore Shiv Sena party chief Uddhav Thackeray ysh 95 | Loksatta

संजय राठोडांना धक्का देत सुनील महाराज शिवसेनेत!

मंत्री संजय राठोडांना धक्का देत पोहरादेवी गडातील बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

संजय राठोडांना धक्का देत सुनील महाराज शिवसेनेत!
संजय राठोडांना धक्का देत सुनील महाराज शिवसेनेत!

वाशीम : मंत्री संजय राठोडांना धक्का देत पोहरादेवी गडातील बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.  बंजारा समाजाची काशी म्हणून परिचित असलेल्या पोहरादेवी गडातील बंजारा समाजाचे सुनील महाराज हे महंत आहेत. त्यांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते  शिवबंधन बांधले.

मागील काही दिवसांपासून महंतासह बंजारा समाजाचे काही  बांधव शिवसेनेत जाण्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. यातील महत्त्वाची चर्चा आज खरी ठरली आहे. या नवीन घडामोडीमुळे बंजारा समाजाच्या ‘काशी’तील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्वत: सुनील महाराज यांनी शिवसेनेत जाण्याबाबत माहिती दिली होती. अखेर आज त्यांनी मुंबई येथे  उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. बंजारा समाजाची काशी म्हणून पोहरादेवी सर्वश्रूत आहे. येथील महंतांना बंजारा समाजात मोठे स्थान आहे. बंजारा समाजाचे मंत्री संजय राठोड यांना शह देण्यासाठी शिवसेनेने महंत सुनील महाराज यांना शिवसेनेत घेऊन जोरदार धक्का दिल्याचे बोलले जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
आंबा घाटात ट्रक डोंगरकडय़ावर आदळल्याने एक ठार

संबंधित बातम्या

राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचा कार्यकर्त्यांना नव्हता थांगपत्ता; सिंधुदुर्ग जिल्ह्याची मनसे कार्यकारिणी बरखास्त
VIDEO: राऊतांना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली, शिवी देत म्हणाले, “*** तू यापुढे…”
“बाबासाहेब पुरंदरेंच्या विकृत व अनैतिहासिक मांडणीवर…”, राज ठाकरेंच्या भेटीनंतर जयसिंगराव पवारांचा मोठा खुलासा
“सुषमा अंधारेंच्या मेंदुला…” राज ठाकरेंवरील टीकेला प्रत्युत्तर देताना मनसे नेत्याची जीभ घसरली!
“आपल्याकडील इतिहास मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी…”, राज ठाकरेंचं मोठं विधान

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांनी बेळगावला येणं अनुकूल नाही”, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंचा इशारा
पोलीस उपनिरीक्षक विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेची निवड यादी जाहीर; यंदा डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शारीरिक चाचणी
‘मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या निर्णयाला जाणीवपूर्वक उशीर’; शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचा आरोप
विजय दिवस सोहळ्यात यंदा भरगच्च कार्यक्रम; रौप्यमहोत्सवानिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, शरद पवार यांना निमंत्रण
FIFA WC 2022: मोक्याच्या क्षणी ह्वांग ही चॅन चा गोल! द. कोरिया बाद फेरीत दाखल, मात्र जिंकूनही उरुग्वे विश्वचषकातून बाहेर