श्रीरामपूर : बँक ऑफ बडोदाच्या रोखपालाने तब्बल दहा लाख रुपयांचा नोटा जाळून टाकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नोटा जाळल्यानंतर शॉर्ट शॉर्टसर्किने आग लागल्याचा बहाणा त्याने केला. नेवासे तालुक्यातील सलाबतपूर येथे ही घटना घडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बँक ऑफ बडोदाच्या नेवासा तालुक्यातील सलाबतपूर शाखेत दि. २५ सप्टेंबर रोजी  ही घटना घडली होती. मात्र तब्बल एक महिन्यानंतर नेवासे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे. या प्रकरणी बँकेतील रोखपाल रमेश बाजीराव वाघ (रा. साईसिटी, नेवासा फाटा, नेवासा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अमोल बद्रिनाथ सोनवणे (रा. नवीन चांदगाव, ता. नेवासा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वाघ हा बँक ऑफ बडोदाच्या सलाबतपूर शाखेत रोखपाल म्हणून काम करतो. त्याने बँकेतील १० लाख १२ हजार ४३५ रुपयांच्या भारतीय चलनातील नोटा स्वत: जाळून टाकल्या. परंतु, त्या नोटा शॉर्टसर्किट होऊन जळून गेल्याचा बहाणा केला. बँकेचे नुकसान करण्याच्या हेतूने रोखपालाने हा प्रकार केला.

नेवासा पोलिस ठाण्यात रोखपाल रमेश वाघ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भिंगारे हे करीत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bank of baroda cashier burned 10 lakhs of notes
First published on: 23-10-2018 at 02:44 IST