अलिबाग- सरखेल कान्होजी आंग्रे समाधी स्थळ परिसराच्या सुशोभीकरणाचे काम रखडण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून सुशोभिकरणाचे काम ठप्प झाले आहे. पुरातत्व विभागाच्या हस्तक्षेपामुळे हे काम थांबविण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.

२१ जानेवारीला राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, आंग्रे घराण्याचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. संरक्षक भिंत आणि आरमारी नौकेची प्रतिकृती उभारणीचे काम हाती घेण्यात आले होते. पण पुरातत्व विभागाने यात हरकत घेतल्याने हे काम थांबविण्यात आले आहे.

हेही वाचा >>> Narendra Dabholkar Murder : ११ वर्षांनंतर निकाल; दोन आरोपींना जन्मठेप, सबळ पुराव्याअभावी तिघे निर्दोष

आंग्रे समाधिस्थळाच्या सुशोभिकरणासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेतून दोन कोटींचा निधी मंजूर केला होता. या कामासाठी आणखिन निधी लागणार असल्याने नाविन्य पुर्ण उपक्रमातून तीन कोटी रुपयांचा निधी मी मंजूर करण्यात आला. त्यामुळे पाच कोटींचा निधी या कामासाठी उपलब्ध झाला आहे. ज्या आंतर्गत पहिल्या टप्प्यातील कामे केली जाणार आहेत.

हेही वाचा >>> “उद्धव ठाकरे नकली संतान”, पंतप्रधान मोदींच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; म्हणाले, “अत्यंत दळभद्री…”

आंग्रे समाधीस्थळ उद्यानाच्या प्रवेश द्वारावर भव्य गलबताच्या प्रतिकृतीची उभारणी करणे, संरक्षक भिंतीवर कोरीव काम करून, किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारणे, एफआरपी मटेरियलच्या दिपमाळांची उभारणी करणे, कान्होजी राजे आंग्रे यांच्या जीवनावरील म्यूरल्स तयार करणे, उद्यानात रोषणाई करणे यासाठी लागणारे आवश्यक बांधकामे करणे. ही कामे या योजने अंतर्गत केली जाणार आहेत. जानेवारी महिन्यात या कामाला सुरूवात करण्यात आली होती. त्यासाठी आवश्यक निविदा प्रक्रीया, तांत्रिक मान्यताही प्राप्त झाल्या होत्या. मात्र पुरातत्व विभागाने काही कामांबाबत प्रश्न उपस्थित केल्याने हे काम तात्पुरते थांबविण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.   

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुशोभिकरणाच्या कामासंदर्भात पुरातत्व विभागाचे काही शंका होत्या. त्यामुळे हे काम थांबविण्यात आले होते. पुरातत्व विभागाशी बोलून या शंकांचे निरसन करण्यात येत आहे. लवकरच हे काम सुरू होईल. अंगाई साळुंखे, मुख्याधिकारी अलिबाग नगर परिषद