रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर दौ-यावर असलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यावर मधमाशांनी अचानक हल्ला चढवला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मधमाश्यांपासून वाचविण्यासाठी अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले. तर उपस्थित सर्वांचीच पळापळ झाली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, उद्योगमंत्री उदय सामंत तसेच स्थानिक आमदार संगमेश्वर कसबा येथे उभारण्यात येणा-या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेच्या पहाणीसह आढावा बैठकीसाठी दौरा आयोजित करण्यात आला होता. या रत्नागिरी दौऱ्याच्या वेळी आढावा बैठकीत अधिका-यांना सुचना दिल्या नंतर येथील जागेची पहाणी पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आली. याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील सरदेसाई यांच्या वाड्याची पहाणी करण्यास सुरुवात केली असता अचानक मधमाश्यांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला चढविला. यात अजित पवार यांना मधमाश्यां पासून वाचविताना अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुरक्षित गाडीत बसविल्या नंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र या गोंधळात अधिकारी आणि पोलीस कर्मचा-यांना मधमाश्यांनी पाठलाग करत चावा घेतल्याने अनेक जण जखमी झाले. परभणी जिल्हा दौऱ्यातही शेतकऱ्यांनी अजित पवारांच्या ताफ्यावर चुना फेकून हल्ला करण्यात आला होता. तसेच दुस-या दिवशी सुद्धा पवार यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.