विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत व्हीप झुगारून मतदान करणाऱ्या शिवसेनेच्या १४ आमदारांना शिंदे गटाकडून आपात्रतेची नोटीस पाठण्यात आली आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी याबाबत माहिती दिली. गोगवले यांनी याबाबत विधानसभा अध्यक्षांकडे तक्रारही दाखल केली होती. दरम्यान बाळासाहेब ठाकरेंबद्दलच्या आदरापोटी आदित्य ठाकरे यांचे नाव वगळून इतर १४ आमदारांना शिंदे गटाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.

 बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचा आदर असल्यामुळे आम्ही आदित्य ठाकरे यांचे नाव अपात्रतेसाठी दिलेल नाही. मात्र, यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील असे भरत गोगावले म्हणाले.

शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे-भाजपा सरकारने पहिली लढाई जिंकल्यानंतर आता विश्वासदर्शक ठरावही जिंकला आहे. राज्यपालांच्या निर्देशानुसार दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. पहिल्या दिवशी भाजपाच्या राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आज विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. यावेळी शिंदे गट आणि भाजपाने १६४ मतं मिळवत विश्वासदर्शक ठराव जिंकला. महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली, तर तीन आमदार तटस्थ राहिले.