२०२२ साली राज्यातील राजकारणात मोठा भूकंप घडला. एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी केली. यामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. सूरत-गुवाहाटी-गोवा असा प्रवास करून शिंदे गटानं भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली. सत्तेत आल्यानंतर शिंदे गटातील आमदारांनी अजित पवार यांनी निधी देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप केला होता. पण, अजित पवार शिंदे-भाजपा सरकारच्या सत्तेत सहभागी झाले आहेत.

आता शिंदे गटातील काहीजण उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. पण, भविष्यात उद्धव ठाकरे यांच्याकडे परत जाणार का? यावर महाडचे आमदार भरत गोगावले यांनी भाष्य केलं आहे. ते ‘एबीपी माझा’च्या ‘माझा कट्ट्या’वर बोलत होते.

devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
savita prabhune on caste Discrimination in industry
“तुम्ही विशिष्ट आडनावाचे…”, भेदभावाबद्दल सविता प्रभुणे यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “मला उलट या इंडस्ट्रीचा…”
sanjeev naik reaction on shiv sena offer to contest lok sabha elections from thane
Lok Sabha Election 2024 : शिवसेनेकडून कोणीही कुठलीही ऑफर दिलेली नाही- संजीव नाईक यांनी दिले स्पष्टीकरण

हेही वाचा : “छगन भुजबळ वयाने मोठे, अन्यथा…”, शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेनंतर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

भरत गोगावले म्हणाले, “याबद्दल आजच सांगू शकत नाही. राजकारण आणि खेळात काय घडेल, हे सांगता येत नाही. एकनाथ शिंदे यांचा स्वभाव फार वेगळा आहे. एकनाथ शिंदे कुणाला अडचणीत टाकत नाहीत. कुठल्याही प्रसंगात असल्यावर एकनाथ शिंदे यांच्याकडे मदत मागितली, तर ते मदत करणारच.”

हेही वाचा : ९ आमदारांना मंत्रिपद मिळाल्यानं अन्याय झाला? सरकारमध्ये राष्ट्रवादीला घेण्याची गरज नव्हती? भरत गोगावले म्हणाले…

उद्धव ठाकरेंकडून ‘मातोश्री’ची दारे तुमच्यासाठी उघडी असतील का? या प्रश्नावर भरत गोगावलेंनी म्हटलं, “शरद पवार यांच्याबद्दल बाळासाहेब काय बोलायचे, हे सर्वांना माहिती. पण, नंतर समीकरण बदलली. त्यामुळे राजकारणात काय घडेल, हे आज सांगू शकत नाही.”