सध्या राज्यात तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालीला सुरूवात झाली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिंदे गटातील अनेक आमदारांची नावे चर्चेत आहेत. पण, दोन्ही मंत्रिमंडळ विस्तारात महाडचे आमदार भरत गोगावले यांची संधी हुकली आहे. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून आलेल्या ९ आमदारांना मंत्रीपदाची लॉटरी लागली. त्यामुळे भरत गोगावलेंवर अन्याय झाल्याची चर्चा रंगलेली. यावर भरत गोगावले यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

“राष्ट्रवादीच्या आमदारांना घेऊ नये हे आमचं आणि भाजपाच्या आमदारांचं मत झालं. पण, पुढच्या राजकारणासाठी टाकलेल्या डावातून हे सर्व घडलं आहे,” असं भरत गोगावले यांनी सांगितलं. ते ‘एबीपी माझा’च्या ‘माझा कट्टावर’ बोलत होते.

हेही वाचा : तटकरे आणि गोगावले सूर जुळणे अशक्यच

भरत गोगावले म्हणाले, “शिवरायांच्या विचाराने चालणारा मी कार्यकर्ता आहे. ‘लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे’, त्याप्रमाणे आम्हाला जाणीव झाली की, एकनाथ शिंदे अडचणीत आले, तर आमच्या आमदारकीचा उपयोग काय? अशा काही घटना घडतात की, त्या अजरामर होतात. राजकारणात आमची नोंद होऊ शकते.”

हेही वाचा : शिंदे गटाचे भरत गोगावले यांची राष्ट्रवादीकडून कोंडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रवादीच्या ९ आमदारांना मंत्रिपद मिळाल्यानं अन्याय झाला? सरकारमध्ये राष्ट्रवादीला घेण्याची गरज नव्हती? असे प्रश्न विचारल्यावर भरत गोगावलेंनी म्हटलं, “हे आमचं आणि भाजपाच्या आमदारांचं मत झालं. पण, भविष्यातील राजकारणासाठी टाकलेल्या डावातून हे सर्व घडलं, हे आम्ही समजून घेतलं आहे. अजून १४ मंत्रिपद आहेत. यासाठी देवीला साकडं घातलं आहे.”