आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस होता. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी घोषणांच्या माध्यमातून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले होते. अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवशीही विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, या सगळ्यात लक्ष वेधून घेतलं ते भाजपाचे आमदार नितेश राणे (nitesh rane) आणि शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या झालेल्या शाब्दिक वादाने. प्रश्नोत्तराच्या तासात मध्ये मध्ये बोलणाऱ्या नितेश राणेंना जाधवांनी चांगलंचं धारेवर धरलं.

हेही वाचा- अब्दुल सत्तारांच्या मंत्रीपदाबाबत अजित पवारांना आश्चर्य; म्हणाले, “तुमच्याकडे कृषीमंत्रीपद आल्यामुळे मी…”!

भास्कर जाधवांची विधानसभा अध्यक्षांना विनंती

रवींद्र चव्हाण आणि सुनील प्रभू यांच्या प्रश्नोत्तराचा तास सुरु होता. भास्कर जाधव आपले मुद्दे मांडत होते. मात्र. नितेश राणे मध्येच भास्कर जाधवांना टोकताना दिसले. त्यामुळे मध्ये मध्ये बोलणाऱ्या नितेश राणे (Nitesh Rane) यांना काहीतरी शिकवा, अशी विनंती जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांना केली.

जाधव मुद्दे मांडत असताना राणे मध्येच बोलल्याने वाद

“मी प्रश्न विचारून थकलो आहे. तुमचे अधिकारी मात्र तेच तेच उत्तर देतात, असा टोला जाधव यांनी राज्य सरकारला लगावला. २०२३ हा आकडा कायम आहे, परशूराम घाटाचा विषय कायम आहे, लोकांच्या कोर्ट कचेरीचा प्रश्न आहे. कोर्ट कचेरी पनवेल ते इंदापूर थोडीशी आहे, बाकी कुठे नाही, असे आपले मुद्दे मांडत असताना मध्येच नितेश राणे बोलले. त्यावर मला तुम्हाला विचारण्याची आवश्यकता वाटत नाही. मी सरकारला विचारतो”, असे भास्कर जाधव म्हणाले.

हेही वाचा- सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीचं खुलं आव्हान; म्हणाले, “सध्याच्या सरकारचे…”

या अधीही दोघांमध्ये अनेकदा वाद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भास्कर जाधव बोलत असताना नितेश राणे यांनी बसूनच काहीतरी बोलण्याचा प्रकार केला. यावर भास्कर जाधव यांनी आक्षेप घेतला. “मी मंत्र्यांशीच बोलत आहे. अध्यक्ष महोदय, त्यांना काहीतरी शिकवा, अशी भास्कर जाधव यांनी अध्यक्षांना विनंती केली. याआधीही या दोन नेत्यांमध्ये अनेकवेळा वाद झालेला पाहायला मिळाले आहे.