मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर राज्यातलं वातावरण तापू लागलं आहे. राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मे अर्थात आजचा अल्टिमेटम दिल्यानंतर त्यावरून चर्चा सुरू झाली आहे. ४ मे अर्थात उद्यापासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये, म्हणून आजच आवश्यक ती पावलं उचलण्याचा निर्णय पोलीस विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. यासंदर्भात मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांना देखील नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला विरोध करणाऱ्या भीम आर्मीने आता मनसेसोबत थेट दोन हात करण्याचा इशारा दिला आहे.

भीम आर्मीकडून राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला विरोध करण्यात आला होता. राज ठाकरेंनी सभेसाठी दिलेल्या नियमांचं उल्लंघन केल्यास त्याच सभेत शाहू-फुले-आंबेडकरांच्या नावाने घोषणाबाजी करून सभा उधळून लावू, असा इशारा भीम आर्मीने दिला होता. त्यावर सभेदरम्यान उपस्थितांमध्ये काहीसा गोंधळ पाहाताच राज ठाकरेंना भाषण सुरू असतानाच “मनसेच्या सभेत काही वेडं-वाकडं कराल तर चौरंग बनवून घरी पाठवेन”, अशा शब्दांत गोंधळ घालणाऱ्यांची कानउघाडणी केली होती.

बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाईंना पोलिसांची नोटीस; सरदेसाई म्हणतात, “अशा नोटिसा…!”

“राज ठाकरेंच्या चेलेचपाट्यांना अटक करा”

यानंतर आता भीम आर्मीनं पुन्हा एकदा मनसेला इशारा देत थेट दोन हात करण्याचंच आव्हान दिलं आहे. भीम आर्मीचे राष्ट्रीय सचिव अशोक कांबळे यांनी जारी केलेल्या व्हिडीओ संदेशामध्ये हे आव्हान देण्यात आलं आहे. “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना नम्र विनंती करतो की आजच्या आज राज ठाकरे आणि त्यांच्या चेलेचपाट्यांना, कार्यकर्त्यांना अटक करा. उद्या जर त्यांच्यामुळे या देशात हिंदू-मुस्लीम दंगली घडल्या, कुणाचं रक्त सांडलं, तर याद राखा, आम्ही त्यांना सोडणार नाही. आमचा आणि त्यांचा संघर्ष अटळ आहे”, असं अशोक कांबळे म्हणाले आहेत.

“राज ठाकरेंवर आजच कारवाई होणार”; पोलीस महासंचालकांची महत्वाची माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…तर आमचा आणि त्यांचा संघर्ष अटळ!”

“आम्ही फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांवर काम करतो. लोकांमध्ये जाऊन काम करतो. लोकांमध्ये प्रबोधनाचं, बंधुभावाचं काम करतो. हा देश एकसंघ राहावा यासाठी मेहनत घेतो. अशा वेळी असं घाणेरडं राजकारण राज ठाकरे करत असतील, त्यांच्यामुळे दंगल होत असेल तर आमचा आणि त्यांचा संघर्ष अटळ आहे”, असा इशारा देखील कांबळे यांनी दिला आहे.