औरंगाबाद : “राज्यसभा निवडणुकीत खेळला गेलेला जुना डाव हा विरोधकांना समजला असल्याने ‘शतरंज के बादशाह’ देवेंद्र फडणवीस विधान परिषदेत आता नवा डाव टाकणार आहेत,” असं मोठं वक्तव्य भाजपा नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलंय. तसेच विधान परिषदेत भाजपा आपले पाचही उमेदवार जिंकून आणेल, असा विश्वासही रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. ते औरंगाबादमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.

रावसाहेब दानवे म्हणाले, “भाजपाने विचारपूर्वक विधान परिषद निवडणुकीत पाच उमेदवार दिले आहेत. याआधी ‘शतरंज के बादशाह’ देवेंद्र फडणवीस यांनी शतरंजची खेळी करून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला हरवलं. आता तोच खेळ आम्ही खेळणार नाही. आता आम्ही वेगळा डाव टाकणार आहोत. कारण आता या तिन्ही पक्षांना आमचा आधीचा डाव माहिती झाला. ते आता त्याच रस्त्याने जातील. त्यामुळे आम्ही वेगळा मार्ग काढून पुन्हा आमचे विधान परिषदेचे सर्व उमेदवार जिंकवणार आहोत.”

gondia lok sabha constituency, NCP s Praful Patel, Praful Patel Family Cast Votes, Gondia , Gondia Polling Station Disorder, gondia polling news, polling day, polling news, lok sabha 2024, election 2024, gondia news,
खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क; मतदान केंद्रावरील अव्यवस्था पाहून…
BJP Workers, Protest Burn Effigy, Outside Vilas Muttemwar s Residence, During Code of Conduct, Muttemwar register complaint, election commission, nagpur code of conduct violation, nagpur news, bjp nagpur,
माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांची भाजपविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
Narendra Modi criticism that Shiv Sena is fake with Congress
काँग्रेसबरोबर नकली शिवसेना! नरेंद्र मोदी यांची टीका, चंद्रपुरात पंतप्रधानांची पहिली प्रचार सभा
PM Modi Said Uddhav Thackeray Shivsena is Duplicate
“काँग्रेसबरोबर असलेली शिवसेना नकली, एकनाथ शिंदेच बाळासाहेब ठाकरे यांचे..”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य

“आमचा डाव एकनाथ खडसे यांनाच नाही, तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला पराभूत करण्याचा आहे. नावाला नाही, तर पक्षाला हरवणार आहे, मग त्यात माणसं येतीलच,” असंही दानवे यांनी सांगितलं.

“खडसेंना उमेदवारी न दिल्यास बिनविरोधची चर्चा”, रावसाहेब दानवे म्हणाले….

एकनाथ खडसे यांच्या उमेदवारीबाबत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, “एकनाथ खडसे यांना विधान परिषद उमेदवारी न दिल्यास निवडणूक बिनविरोध करण्याचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडून त्यांना देण्यात आला नाही. कारण देवेंद्र फडणवीस आणि मी बुधवारी (१५ जून) सोबत होतो.”

“आमची या विषयावर चर्चा झाली. खडसेंना उमेदवारी देऊ नका असा कोणताही प्रस्ताव आम्ही दिला नाही. तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. आम्ही का कुणाचं नाव सुचवावं,” असंही दानवेंनी नमूद केलं.

“पंकजा मुंडेंनी स्वतःचा पक्ष काढावा”; जलील यांच्या वक्तव्यावर दानवेंचं प्रत्युत्तर

रावसाहेब दानवे यांनी पंकजा मुंडे यांची नाराजी आणि जलील यांनी त्यांना स्वतंत्र पक्ष काढण्याबाबत केलेलं आवाहन यावरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “राजकारणात दुसऱ्यात कसा खोडा घालता येईल असा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. इम्तियाज जलील म्हटल्यानंतर पंकजा मुंडे त्याला प्रतिसाद देतील असं नाही.

हेही वाचा : “मांजर पिलं उचलून फिरते तसं शिवसेना आमदार घेऊन फिरते”, दानवेंच्या टीकेवर सुभाष देसाईंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

“पंकजा मुंडे भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. गोपीनाथ मुंडे भाजपाचे संस्थापक सदस्य होते. त्यामुळे पंकजा मुंडे कुणाच्याही बोलण्यावर काही निर्णय घेतील असं नाही. त्या पक्षाच्या राष्ट्रीय चिटणीस आहेत. पक्ष योग्य वेळी त्यांचा विचार करेल याची मला खात्री आहे,” असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.