अहिल्यानगर: भाजपची शहर जिल्ह्याची जम्बो नूतन कार्यकारिणी शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी आज, रविवारी जाहीर केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रदेश महामंत्री विजय चौधरी व विभाग संघटन मंत्री रवी अनासपुरे यांच्या मान्यतेने नूतन कार्यकारिणी जाहीर करत असल्याचा दावा त्यांनी केला. कार्यकारिणीत ९ उपाध्यक्ष, ४ सरचिटणीस, ७ चिटणीस, प्रसिद्धी प्रमुख, कार्यालयीन प्रमुख, कोषाध्यक्ष व ६१ सदस्य, मोर्चा, आघाड्या, प्रकोष्ठ व सेल प्रमुख तसेच विशेष निमंत्रित व विशेष आमंत्रितांचा समावेश आहे.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे: अध्यक्ष- अनिल मोहिते, उपाध्यक्ष- दीप्ती गांधी, मालन ढोणे, बाबासाहेब सानप, बाळासाहेब भुजबळ, ज्ञानेश्वर काळे, उदय अनभुले, नितीन शेलार, साहेबराव विधाते व गोपाल वर्मा. सरचिटणीस- निखिल वारे, अशोकराव गायकवाड, महेश नामदे, ज्योती दांडगे. चिटणीस- मिलिंद भालसिंग, करण ढापसे, स्वप्निल दगडे, पियुष जग्गी, चंद्रकांत पाटोळे, विजय गायकवाड व राहुल मुथा. कोषाध्यक्ष- रामदास आंधळे, कार्यालयीन मंत्री- मुकुल गंधे, अनुसूचित मोर्चा अध्यक्ष- संजय गायकवाड, युवा मोर्चा अध्यक्ष- रुद्रेश अंबाडे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष- गणेश विद्दे, आदिवासी मोर्चा अध्यक्ष- वैभव सुरवसे, प्रसिद्धी प्रमुख- शशांक कुलकर्णी, संवादक- अविनाश वाणी, कामगार आघाडी प्रकोष्ट प्रमुख- महादेव गाडे, उद्योग आघाडी प्रमुख- निनाद टिपूगडे, व्यापारी आघाडी प्रमुख- महेश गुगळे, वैद्यकीय विभाग प्रमुख- डॉ. धैर्यशील केवळ, कायदा विभाग प्रमुख- चंदन बारटक्के, वाहतूक विभाग प्रमुख- प्रियंका चौधरी, समाज माध्यम प्रमुख- सार्थक आगरकर, शिक्षक विभाग प्रमुख- वैभव सांगळे, अध्यात्मिक समन्वय प्रकोष्ट प्रमुख- मयूर जोशी, पदवीधर प्रकोष्ट प्रमुख- दामोदर बठेजा, क्रीडा प्रकोष्ट प्रमुख- आदित्य धोपावकर, जैन प्रकोष्ठ प्रमुख- रवींद्र बाकलीवाल, सांस्कृतिक सेल प्रमुख- पुष्कर तांबोळी, आयटीसी प्रमुख- रोहित तोलानी, आयुष्यमान भारत विभाग प्रमुख- राजू वाडेकर.
विशेष निमंत्रित- पालकमंत्री राधाकृष्ण विखे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, डॉ. सुजय विखे, बाबासाहेब वाकळे. विशेष आमंत्रित- अभय आगरकर, सुनील रामदासी, सदाशिव देवगावकर, वसंत लोढा, सुरेंद्र गांधी, मिलिंद गंधे, किशोर वाकळे, रवींद्र बारस्कर, आशा कराळे, मनोज दुलम, सोनाबाई शिंदे, मनोज कोतकर, पल्लवी जाधव, बाळासाहेब गायकवाड, अनिल गट्टानी, नरेंद्र कुलकर्णी, लता शेळके, राहुल कांबळे, गौरी नन्नावरे, गीता गिल्डा, दामोदर बठेजा, वंदना ताठे व सुरेखा विद्ये याशिवाय ६१ सदस्यांचा समावेश आहे.