scorecardresearch

Premium

VIDEO : “राज्यात सरकार तीन पक्षांचं असलं, तरी भाजपा हा…”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

“हे सरकार तीन पक्षांचं असलं, तरी…”, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

devendra fadnavis
दरम्यान, संधी मिळाल्यावर अजित पवारांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करू, असं विधान देवेंद्र फडणवीसांनी बुधवारी एका कार्यक्रमात केलं होतं.

महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार आहे. आपल्याबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे. पण, तिघांमध्ये भाजपा हा मोठा भाऊ आहे. त्यामुळे मोठ्या भावाला त्यागही करावा लागतो. मोठ्या भावाला दोन्ही भावांना सांभाळून घ्यावं लागतं. ही जबाबदारी आपल्याला पार पाडावी लागेल, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

राज्यातील पदाधिकारी आणि जिल्ह्याध्यक्षांना देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत संबोधित केलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हे सरकार तीन पक्षांचं असलं, तरी भाजपा आपल्या ध्येयधोरणापासून हटणार नाही. भाजपा ध्येय आणि धोरणावर काम करत राहिल. दोन्ही मित्रपक्षांना बरोबर घेऊन निश्चितपणे काम करणार आहोत.

devendra fadnavis (1)
“जेव्हा पक्ष सांगेल, तुझी गरज नाही आता…”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
nitish kumar
बिहारमध्ये ईबीसी, ओबीसी ६३% नितीशकुमार सरकारचे सर्वेक्षण जाहीर; महाराष्ट्रातही ओबीसी गणनेची वाढती मागणी
Jayant patil on election commission
“पक्षात फूट नसल्याचं सांगूनही सुनावणी लावली”, जयंत पाटलांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
jitendra awhad
“विधिमंडळातील आमदारांचा गट हा पक्ष होऊ शकत नाही, कारण…”, जितेंद्र आव्हाडांचं विधान

“२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आपण ४० च्या वरती जागा मिळवल्या होत्या. यंदाच्याही निवडणुकीत मेहनत केली, तर सर्व रेकॉर्ड तोडू शकतो,” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : “एक अफवा सकाळी सोडायची, दुसरी अफवा संध्याकाळी सोडायची”; फडणवीसांचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

“निवडणुकीनंतर नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं, हा आपला संकल्प आहे. मोदींना पंतप्रधान बनवणे हे भाजपासाठी नव्हे तर भारतासाठी महत्वाचे आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp big brother eknath shinde shivsena and ajit pawar ncp say devendra fadnavis ssa

First published on: 03-10-2023 at 17:10 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×