सांगली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले असले तरी ते एकत्र आले असे नाही, तर ती निवडणुकीसाठी झालेेली आघाडी आहे, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. बिहारमध्ये एनडीएला प्रचंड बहुमत मिळाले आहे. याबद्दल भाजपचा कार्यकर्ता व सामान्य माणूस म्हणून मला निश्चितच आनंद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सामान्य नागरिकांशी जोडले गेल्याने हे यश मिळाले आहे. मतचोरी करण्यात आल्याचा खोटा प्रपोगंडा करणारे आता काय म्हणणार, असा माझा सवाल आहे असेही ते या वेळी म्हणाले.
आज ईश्वरपूरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी विश्वनाथ डांगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, महायुतीमधील सर्व घटक पक्ष एकत्र असून, राज्यात सुमारे ३०० नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. यापैकी ९० टक्के नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निश्चित करण्यात आले असून, पूर्णपणे शास्त्रीय कसोटीवर उमेदवार जाहीर करण्यात येत आहेत. यातील पहिला उमेदवार ईश्वरपूरचा जाहीर करण्यात आला असून, राज्यात पहिला उमेदवारी अर्ज त्यांचाच आहे. ३०० पैकी १०० ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाजपचे असतील.
बिहारमध्ये एनडीएला प्रचंड बहुमत मिळाले आहे. याबद्दल भाजपचा कार्यकर्ता व सामान्य माणूस म्हणून मला निश्चितच आनंद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सामान्य नागरिकांशी जोडले गेल्याने हे यश मिळाले आहे. मतचोरी करण्यात आल्याचा खोटा प्रपोगंडा करणारे आता काय म्हणणार, असा माझा सवाल आहे. बिहारची मतदार यादी नवीन झाली होती. मग दुबार मतांचा प्रश्नच कुठे येतो. खोट्या नरेटिव्हमुळे जर त्यांना जास्त जागा मिळाल्या असत्या तर मतदान यंत्र चांगले, असे ते म्हणाले असते.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बिहारमध्ये यावे, असा बिहारमध्ये लोकांचा आग्रह होता, त्यामुळे तेथे गेले आणि चार सभा घेतल्या. बिहार निकालानंतर मतदान यंत्र सदोष आहे, व्हीव्हीपॅटमध्ये समस्या आहेत, दुबार मतदान असे नेहमीचेच आरोपाचे विरोधकांचे मुद्दे असले तरी बिहारमधील जनतेने योग्य तो निकाल दिला आहे, असेही ते म्हणाले.
महायुतीमधील सर्व घटक पक्ष एकत्र असून, राज्यात सुमारे ३०० नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. यापैकी ९० टक्के नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निश्चित करण्यात आले असून, पूर्णपणे शास्त्रीय कसोटीवर उमेदवार जाहीर करण्यात येत आहेत. यातील पहिला उमेदवार ईश्वरपूरचा जाहीर करण्यात आला असून, राज्यात पहिला उमेदवारी अर्ज त्यांचाच आहे. ३०० पैकी १०० ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाजपचे असतील.
