भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून थेट राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केलंय. भाजपाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर राजन पाटील यांच्या भाषणाचा व्हिडीओ शेअर केलाय. तसेच सुप्रिया सुळे आणि रुपाली चाकणकर यांना टॅग करत सवाल केला आहे.

भाजपाने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार राजन पाटील यांनी “आमच्या पोरांना लग्नाआधी पोरं होतात” असं वक्तव्य केलं. सुप्रिया सुळे तुमच्या माजी आमदाराच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया आहे? हीच संस्कृती आहे का राष्ट्रवादी काँग्रेसची? रुपाली चाकणकर या व्यक्तीला नोटीस पाठवणार का?”

राजन पाटील नेमकं काय म्हणाले होते?

राजन पाटील म्हणाले, “ही निवडणूक भीमा कारखान्याची आहे की राजन पाटलांच्या कुटुंबाची आहे हेच कळायला मार्ग नाही. ते आमच्या पोरांना बाळ म्हणत आहेत. अरे आम्ही पाटील आहोत. याला माहितीच नाही की, पाटलाच्या पोराला लग्नाच्याही आधी यांच्याएवढी पोरं असतात. त्याचा आम्हाला अभिमान आहे.”

हेही वाचा : VIDEO: “पाटलाच्या पोराला लग्नाच्या आधीच पोरं…”, राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जुंपली, माजी आमदाराला प्रवक्त्याचं उत्तर, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ते आमच्या पोरांना भीती दाखवत आहेत. आमची मुलं वयाच्या १७ व्या वर्षी ३०२ चं कलम भोगणारी आहेत,” असंही वक्तव्य राजन पाटील यांनी केलं.