केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याची बाब नाशिकमधील स्थानिक पातळीवर शिवसेना-भाजपमधील नव्या धुमश्चक्रीचे कारण ठरले. दोन्ही गटांकडून दगडांचा वर्षाव झाला. या घटनाक्रमाने राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सेना, भाजपच्या कार्यालयात मात्र नेहमीप्रमाणे शांततेचे वातावरण होते. कार्यकर्त्यांची गर्दी ओसरली. निवडक पदाधिकारी, कार्यकर्ते उफाळलेल्या संघर्षावर मंथन करीत पुढील रणनीती आखत होते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून दोन्ही ठिकाणी पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. असं असतानाच बुधवारी भाजपाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच सामनाच्या संपादिका आणि उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि युवासेनेचे अध्यक्ष वरुण देसाईंविरोधात वेगवेगळ्या कारणांसाठी तक्रारी दाखल करण्यात आल्यात. यासंदर्भातील वृत्त पीटीआयने दिलं आहे.

फेसबुक लाइव्ह केलं…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी राणेंनी वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी शिवसेनेचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यावरून राणे यांच्याविरुध्द जातीय तेढ निर्माण करणे, द्वेष निर्माण करणे अशा विविध कलमांन्वये सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याच साबर पोलीस स्थानकामध्ये आता उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि वरुन देसाईंविरोधात तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिलाय. भाजपाच्या वतीने तीन जणांनी या तक्रारी दाखल केल्या आहेत. पाहिली तक्रार ऋषिकेश अहेर यांनी मुख्यमंत्री आणि वरुण देसाईंविरोधात दाखल केलीय. देसाई यांनी मुंबईमधील राणेंच्या घऱाबाहेर आंदोलन केलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावर देसाई यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. याचं फेसबुकवरुन लाइव्ह प्रक्षेपण करण्यात आल्याने आयपीसी कलम १५३ (अ), १०७ आणि २१२ सहीत सायबर गुन्ह्यांखाली तक्रार दाखल करुन घेण्यात यावी असं म्हटलं आहे.

नक्की पाहा >> Video : मुख्यमंत्र्यांसारखीच चूक नितीन गडकरींनीही केली होती?

योगींवर टीकेमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या…

दुसरी तक्रार सुनील रघुनाथ केदार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात दाखल करण्यात आली असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आलीय. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये योगी असताना आदित्यनाथ मुख्यमंत्री कसे झाले त्यांनी एखाद्या गुहेमध्ये जाऊन ध्यान साधना करायला हवी. तसेच योगी यांना चप्पलांनी मारण्याची भाषा या व्हिडीओत केल्याचं तक्रारीमध्ये म्हटलं आहे. तसेच योगी हे केवळ भाजपाचे नेते किंवा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री नसून गोरखपूर मठाचे महंत असल्याने असं वक्तव्य करुन मुख्यमंत्र्यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. त्यामुळेच उद्धव यांच्याविरोधात कलम १५३ अ (१), १५३ (ब), १८९, २९५ अ. ५०४, ५०५ (२) आणि ५०६ अंतर्गत तक्रार दाखल करावी असं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “फडणवीस व त्यांच्या पक्षाने गांजाच्या शेतात बागडायचे ठरवलेच असेल तर…”; शिवसेनेनं साधला निशाणा

रश्मी ठाकरेंविरोधातही तक्रार

तिसरी तक्रार शिवाजी निवृत्ती बारके यांनी रश्मी ठाकरेंविरोधात दाखल केली असून यामध्ये नाशिक महानगरपालिकेमधील शिवसेनेचे नेते अजय बोरस्ते यांचंही नाव आहे. शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामनामध्ये बुधवारी (२५ ऑगस्ट) राणेंविरोधात अनेक आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले होते. हे शब्द म्हणजे राणेंना संविधानानुसार देण्यात आलेल्या केंद्रीय मंत्री पदाचा अपमान करणारे असल्याचं म्हटलं आहे. तसेच बोरस्ते यांनी या लेखाचे पोस्टर बनवून ते जागोजागी लावून बदनामी केल्याप्रकरणी रश्मी ठाकरे आणि बोरस्तेंविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी तक्रारीमध्ये करण्यात आलीय.

नक्की वाचा >> अटकेनंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत म्हणाले…

काय होतं सामनाच्या अग्रलेखामध्ये?

मंगळवारच्या नाट्यमय घडामोडींवर बुधवारी ‘सामना’तील अग्रलेखातून टीका करताना राणेंचा उल्लेख ‘भोकं पडलेला फुगा’ असा करण्यात आला. “नारायण राणे हे महान किंवा कर्तबगार कधीच नव्हते. शिवसेनेत असताना त्यांचे नाव झाले ते सत्तेच्या शिड्या जलदगतीने चढता आल्यामुळेच. ही सर्व शिवसेना या चार अक्षरांची कमाई. राणे यांनी शिवसेना सोडल्यावर त्यांचा लोकसभा व विधानसभा मिळून चार वेळा दणकून पराभव शिवसेनेने केला. त्यामुळे राणे यांचे थोडक्यात वर्णन करायचेच तर भोकं पडलेला फुगा असेच करता येईल. हा फुगा कितीही हवा भरून फुगवला तरी वर जाणार नाही, पण भाजपने सध्या हा भोकवाला फुगा फुगवून दाखविण्याचे ठरवले आहे. राणे यांना काही लोक ‘डराव डराव’ करणाऱया बेडकाचीही उपमा देतात. राणे हे बेडुक असतील किंवा भोकवाला फुगा, पण राणे कोण? हे त्यांनी स्वतःच जाहीर केले, ‘‘मी ‘नॉर्मल’ माणूस नाही,’’ असे त्यांनी जाहीर केले. मग ते ऍबनॉर्मल आहेत काय ते तपासावे लागेल,” असा टोला या लेखाच्या सुरुवातीलाच लगावण्यात आला.

नक्की वाचा >> अटकेनंतर नारायण राणेंचा शिवसेनेला टोला; शिवसैनिकांच्या संख्येवरुन म्हणाले, “त्यांच्याकडे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच ‘छपरी गँगस्टर’, ‘उपटसुंभ’, ‘सुपारीबाज’ अशाप्रकारची विशेषणं वापरुन राणेंवर निशाणा साधताना भाजपावरही या लेखामधून टीका करण्यात आलीय.