गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराच्या नामकरणाचा मुद्दा रखडला होता. औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ करण्याची मागणी केली जात होती. अखेर औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांचं नामकरण करण्याच्या प्रस्तावा केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. औरंगाबादचं ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचं ‘धाराशिव’ नामकरण केलं जाणार आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबादनंतर आता अहमदनगर शहराचं नामकरण करण्याची मागणी पुढे आली आहे.

अहमदनगर हे शहर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान आहे, त्यामुळे अहमदनगर शहराचं नाव अहिल्यानगर करावं, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात अहमदनगरचं नामकरण अहिल्यानगर होणारच… असा विश्वास गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी एक ट्वीट करत दोन्ही शहरांच्या नामकरणाला मंजुरी मिळाल्याबद्दल शिंदे- फडणवीस सरकारचं अभिनंदनंही केलं आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा- “परकीय आक्रमकांच्या…”, औरंगाबादच्या नामकरणाला मंजुरी मिळताच राज ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

गोपीचंद पडळकर आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, “औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचं नामांतर ‘धाराशिव’ केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे आभार व अभिनंदन. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ होणारच…” असा विश्वास गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केला.

हेही वाचा- महाराष्ट्रात ठाकरे गट आणि आम आदमी पार्टीची युती होणार?, उद्धव ठाकरेंचं सूचक विधान, म्हणाले…

औरंगाबादचं नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानबादचे नामांतर धाराशिव करण्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारने केलेल्या पाठपुराव्यामुळे नामांतराचा प्रश्न सुटला. आता अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगरचे नामांतर सुद्धा शिंदे फडणवीस यांच्या नेतृत्वातच होणार आहे, असा विश्वास पडळकर यांनी व्यक्त केला.

Story img Loader