‘वेदान्त’ समूह आणि फॉक्सकॉन कंपनीचा कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. या सर्व घडामोडींनंतर भारतीय जनता पार्टीचे नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर पलटवार केला आहे. शिवसेनेचा पेंग्विन सेना असा उल्लेख करत त्यांनी ‘मविआ’ला बोचरा सवाल विचारला आहे.

वेदान्त- फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर भाष्य करताना आशिष शेलार म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात मराठी माणसांच्या मनात भ्रम परसवण्याचं काम जाणूनबुजून आणि योजनाबद्ध पद्धतीने होत आहे. हे काम पेंग्विन सेनेमार्फत केलं जातं आहे. त्यामुळे संबंधित प्रकल्पाबाबत काही गोष्टींची स्पष्टता येणं आवश्यक आहे. शिंदे-फडणवीस सरकार याबाबत स्पष्टता आणत आहे.

पण आज काही मुखपत्रांनी त्यावर अग्रलेख लिहिले आहेत. त्यामुळे आमचे पेंग्विन सेनेला आणि पेंग्विन सेनेच्या प्रमुखांना थेट सवाल आहेत. आपण केलेल्या वक्तव्यात किंवा मुखपत्राच्या अग्रलेखात हा वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातींनी खेचून नेला. मग या पद्धतीचा आपला आरोप असेल तर आमचेही काही प्रश्न आहेत, ज्याची उत्तरं आम्हाला अपेक्षित आहेत, असंही आशिष शेलार म्हणाले.

हेही वाचा- ‘वेदान्त’ प्रकरणावरून कॉंग्रेसची पंतप्रधान मोदींवर टीका; म्हणाले, “मोदींनी गुजरातमध्ये करोडो रुपये पाण्यात घातले…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मविआ’वर टीका करताना आशिष शेलार म्हणाले की, जर आपला दावा असेल की हा प्रकल्प गुजरातला खेचून नेला, याचा दुसरा अर्थ असा होतो की हा प्रकल्प महाराष्ट्रात होता. हा प्रकल्प जर महाराष्ट्रात होता तर हा प्रकल्प महाराष्ट्रात कधी सुरू झाला, तो महाराष्ट्रात आला तेव्हा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने त्याला सर्व परवानग्या दिल्या होत्या का? फॉक्सकॉन प्रकल्पासाठी देण्यात येणाऱ्या सवलतीबाबत संमती झाल्या होत्या का? असे अनेक सवाल शेलारांनी विचारले आहेत.