“सध्या देशात करोनाची स्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या हिताचीही जबाबदारी मोठी आहे. राम मंदिराबाबत सध्या कोणताही वाद नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हा वाद मिटला आहे. परंतु करोनाच्या प्रादुर्भावामुळे राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी निमंत्रण मिळालं तरी जाणार नाही,” असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं. यावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. वयापरत्वे शरद पवार यांचा हिंदू धर्मावरील राग वाटत असल्याचं राणे म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“बातमीची हेडिंग वाचली तेव्हा वाटलं एमआयएम पक्षाचे ओवेसी बोलत आहेत. नंतर शरद पवार यांचं नाव दिसलं. एवढं मात्र खरं शरद पवार यांचं वय बघून कोणी काही बोलत नाही. पण जसं जसं वय वाढतंय तसा हिंदू धर्मावर शरद पवार यांचा रागही वाढताना दिसत आहे,” अशी टीका निलेश राणे यांनी केली. त्यांनी ट्विटरवरून शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

आणखी वाचा- “कुर्बानीनं करोना जाणार म्हणजे…”; शरद पवारांना प्रविण दरेकरांचा टोला

आणखी वाचा- उद्धव ठाकरे राम मंदिर भूमिपूजनाला गेल्यास माझी हरकत नाही- शरद पवार

सध्या संपूर्ण देशाचं लक्ष अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाकडे लागलं आहे. ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हे भूमिपूजन पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रण दिलं जाणार आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निमंत्रण दिलं तरी आपण राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी जाणार नाही असं म्हटलं होतं. न्यूज १८ लोकमतला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. याआधी शरद पवार यांनी काहींना वाटतं मंदिर बांधून करोना जाईल अशी टीका केली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader nilesh rane criticize ncp leader sharad pawar ram mandir comment twitter jud
First published on: 29-07-2020 at 13:31 IST