विजयादशमीनिमित्त मुंबईच्या शिवाजी पार्कवर शिवेसेनेकडून दरवर्षी दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. या मेळाव्यासाठी शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते राज्यभरातून मुंबईत येतात. मात्र यावर्षी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये चढाओढ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी एक ट्वीट केले असून, त्याद्वारे त्यांनी निशाणा साधल्याचे दिसत आहे.

“लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे? दसरा मेळावा कुठे होणार? आणि हसरा मेळावा कुठे होणार?” असं अतुल भातखळकर यांनी ट्वीटद्वारे म्हटलेलं आहे.

याशिवाय भातखळकर यांनी अन्य ट्वीटद्वारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवर टीका देखील केली आहे.

“प्रकल्प राज्यात आणण्यासाठी मविआ सरकारने खूप प्रयत्न केले, अशी अशी उद्धव ठाकरे यांची वेदान्त फॉक्सकॉन प्रकल्पाच्या वादावर प्रतिक्रिया आहे. प्रयत्न वाझेने पण केले होते. बंगला शोधण्याचे? खाली जिलेटिनवाली गाड़ी उभी करण्याचे. तोच वाझे जो लादेन नाही, असे निर्भिड मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले होते.” असं भातखळकरांनी वेदान्त प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यावरून विरोधकांकडून होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर म्हटलं आहे.

तर, “कोविड काळात मढमध्ये बेकायदा स्टुडिओ बनवणारा अस्लम शेख यांना चालतो. त्याला मदत करण्याची तयारीही असते. दाऊदचा घरगडी नवाब मलिकही चालतो. यांना विरोध करणारे गद्दार ठरतात. आदित्य ठाकरे यांनी गद्दारीची व्याख्याच बदलली आहे.” असं म्हणत अतुल भातखळकर यांनी एकनाथ शिंदे गटातील आमदारांवर आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिल्याचे दिसत आहे.

शिवेसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच? उद्धव ठाकरेंनी दिले कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील विभाग प्रमुखाशी बैठक घेत आगामी दसरा मेळाव्यावर चर्चा केली. यावेळी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. याविषयी बोलताना यावर्षी होणारा दसरा मेळावा विशेष असणार आहे.