मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंग्लडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचं नाव घेत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यूटी असा उल्लेख करत ते लंडनला येतात, मोठमोठ्या संपत्ती विकत घेतात आणि थंडगार हवा खातात असं ऋषी सुनक यांनी सांगितल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केला. एकनाथ शिंदे यांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या या दाव्यावरून भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीकास्र सोडलं आहे. मुख्यमंत्र्यांनी अवघ्या चार वाक्यात घरबश्याच्या अब्रूचे खोबरे केले. तूच आहेस तुझ्या अपमानाचा शिल्पकार, अशा शब्दांत भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. भातखळकर यांनी ‘एक्स’वर पोस्ट लिहून ही टीका केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्यही पोस्ट केलं.

हेही वाचा- ऋषी सुनक यांचं नाव घेत एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंच्या संपत्तीबाबत गौप्यस्फोट, म्हणाले, “ते लंडनला…”

एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

सोमवारी (१२ सप्टेंबर) जळगावमधील पाचोरा येथे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मला विचारलं की, यूटी कसे आहेत. त्यावर मी विचारलं का? तर ते म्हणाले की, ते दरवर्षी लंडनला येतात. मोठ्यामोठ्या संपत्ती खरेदी घेतात, थंडगार हवा खातात. त्यांची खूप माहिती माझ्याकडे आहे. तुम्ही एकदा लंडनला आलात की, मी तुम्हाला सगळं सांगतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी एवढंच सांगतो की, आम्हाला सगळं माहिती आहे. आमच्यावर बोलण्याची वेळ येऊ देऊ नका. अन्यथा पाटणकर काढा घेण्याची वेळ येईल,” असा इशाराही एकनाथ शिंदेंनी दिला.