scorecardresearch

“…त्यामुळे शरद पवारांना वाईट वाटतय आणि म्हणून ते असं विधान करताय” ; गिरीश महाजन यांनी साधला निशाणा!

पुणे मेट्रोच्या उद्घाटन कार्यक्रमास उद्या पंतप्रधान मोदी येणार असल्यावरून शरद पवारांनी लगावला होता टोला.

(संग्रहीत छायाचित्र)

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या पुणे दौऱ्यावर असून, त्यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन होणार आहे. मात्र यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना टोला लगावला आहे. मेट्रोचं काम पूर्ण झालं नाही तरी उद्घाटन होतय, असं पवारांनी बोलून दाखवलं आहे. पुणे महापालिकेने उघडलेल्या सुभ्रदाबाई बराटे रुग्णालायचं उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झालं यावेळी बोलताना शरद पवार यांनी मोदींच्या उद्याच्या दौऱ्यावर भाष्य केलं. तर, शरद पवारांच्या या विधानावर भाजपा नेते गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या पुण्यात येत आहेत. काही कार्यक्रम होत असतील तर त्याची तक्रार करण्याची कारण नाही. मेट्रो सुरू करत आहेत. मला माहिती नाही, एक महिन्यापूर्वी मेट्रोच्या प्रमुखांनी मला मेट्रो दाखवायला नेलं होतं आणि मला त्यांनी मेट्रो दाखवली. पंतप्रधान जाणार आहेत त्या मार्गावर त्या मेट्रोतून मी देखील गेलो, आमचे काही सहकारी होते. माझ्या असं लक्षात आलं की हे मेट्रोचं काम काही सगळं झालेलं नाही. पण ठीक आहे मला नुसतं दाखवलं पण उद्या उद्घाटनाला येत आहेत. काम झालं नाही तरी उद्घटान होतय, माझी काही त्याबद्दलची तक्रार नाही.” असं शरद पवार म्हणाले होते.

“काम झालेले नसतानाही मेट्रोचे उद्घाटन”; पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यावरुन शरद पवारांचा टोला

यावर नाशिकमध्ये बोलताना भाजपा नेते आमदार गिरीश महाजन यांनी, “मला वाटतं या म्हणण्याला कुठेही काही अर्थ नाही. शरद पवार हे मागील वेळेस त्यांचा काही संबंध नसताना, काही कारण नसताना मेट्रोतून फिरून आले होते, त्यांनी प्रयत्न केला होता दाखवायचा की मी किती चांगलं काम करतोय. पण त्या मेट्रोचा आणि त्यांचा काडीचा तरी संबंध आहे का? नाही आहे. मग ते का फिरले त्या मेट्रोमधून. मला वाटतं हे सगळे राजकीय आरोप-प्रत्यारोप आहेत.” असं म्हणत शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलं.

तसेच, “त्यांचा प्रयत्न हाच आहे की, पंतप्रधान येत आहेत सगळं पुणे आता एकदम भाजपामय, मोदीमय झालेलं आहे. त्यामुळे त्यांना साहाजिकच वाईट वाटतय म्हणून त्यांना असं विधान करावं लागतं आणि म्हणून ते करताय.” असंही गिरीश महाजन यांनी यावेळी बोलून दाखवलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp mla girish mahajan criticizes sharad pawar msr