केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपाकडून गैरवापर केला जात असल्याची टीका राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर ईडी, सीबीआय यांच्या कारवायांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आलेले असताना भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराच्या मुद्यावरून निशाणा साधतानाच सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांवर शेलक्या शब्दात टिप्पणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आम्ही त्यांना चोऱ्या करायला लावल्या नव्हत्या”

चोरी केली नसेल, तर घाबरायचं कारण नाही, असं म्हणत सुजय विखे पाटील यांनी टीका केली आहे. “आम्ही तर त्यांना चोऱ्या करायला लावल्या नव्हत्या. त्यांनी चोऱ्या केल्या, भ्रष्टाचार केला, पैसे खाल्ले..देशात सत्तेचा वापर कुणी जास्त केला आहे, हे आणीबाणीच्या काळात देशाच्या जनतेनं पाहिलं आहे. कश्मीर पंडितांवर झालेला अत्याचार देखील जनतेसमोर आला आहे. ज्या लोकांनी पैसे खाऊन कारखाने बांधले, संस्था केल्या हा गरीब जनतेचा पैसा नव्हता का?” असा सवाल सुजय विखे पाटील यांनी केला आहे.

“मी आमदार झाल्यापासून जयंत पाटलांना सुचायचं बंद झालंय”, गोपीचंद पडळकरांची खोचक टीका!

“एकही मंत्री समोर येऊन बोलत नाही की…”

“ज्याचं मन साफ असेल, त्यानं भीती बाळगू नये. जर एखाद्यानं चोरी केलीच नसेल, तर घाबरायचं कारण नाही. का प्रत्येकजण दररोज टीव्हीवर बोलतोय? एकही मंत्री कागदपत्र सादर करून म्हणत नाही की आम्ही स्वच्छ आहोत. तुम्ही चोऱ्या केल्या असतील, तर तुम्हाला पकडायचं नाही असा तर नियम नाहीये ना? देश पंतप्रधानांचं घर आहे. ते चौकीदार या नात्याने चोरांना पकडतील अशी अपेक्षा मला आहे”, असं सुजय विखे पाटील म्हणाले.

यशवंत जाधवांवरील कारवाईबाबत देवेंद्र फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही जे म्हटलं होतं…!”

आघाडीचा संसार म्हणजे नवरा, बायको आणि…

दरम्यान, यावेळी बोलताना सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीला नवरा, बायको आणि वरातींची उपमा देऊन खोचक टोला लगावला आहे. “महाविकास आघाडीचा संसार असा आहे, की यात लग्न राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं आहे. राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूमिकेत आहे. त्यानं काहीही मनमानी करावी, त्याला कुणी काही बोलत नाही. शिवसेना एका मुक्या बायकोसारखी आहे, जिला बोलता येत नाही. आणि काँग्रेसवाले वराती आहेत. ज्यांना लग्नाची पत्रिका नव्हती, पण ते बिन बुलाए जेवायला गेले आहेत. त्यांना लाज नाहीये. ते जेवायचं ताटही सोडत नाहीयेत. त्यांना हाणलं तर खाली बसून जेवतील पण ते लग्नाचं फुकट जेवण सोडायला तयार नाहीत. नवरा मस्त मजा करतोय. ही मूक बायको, तिला झालेला त्रास सहन करायचा आहे. सवत जर आणली तर माझं काय. म्हणून ते मूक बायकोच्या भूमिकेत आहेत”, असं सुजय विखे पाटील म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp sujay vikhe patil mocks shivsena ncp congress on ed cbi raid pmw
First published on: 27-03-2022 at 17:00 IST